बॉलिवूडचे प्रसिद्ध सिलेब्रिटी गंभीर आजारांच्या विळख्यात; अनेक वर्षांपासून करत आहेत संघर्ष

Bollywood Celebrities Disease : सलमान खान याच्यापासून समंथा रुथ प्रभू हिच्यापर्यंत... प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी गंभीर आजाराच्या विळख्यात... आजारांमुळे अनेक सेलिब्रिटींनी घेतलाय मोठा निर्णय... जाणून व्हाल थक्क

बॉलिवूडचे प्रसिद्ध सिलेब्रिटी गंभीर आजारांच्या विळख्यात; अनेक वर्षांपासून करत आहेत संघर्ष
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 2:09 PM

मुंबई | 4 मुंबई 2023 : बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या सिनेमांमुळे आणि रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असतात. गडगंज पैसा, महागड्या गाड्या, आलिशान घर… सेलिब्रिटींच्या इत्यादी गोष्टी कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. एवढंच नाही तर, सेलिब्रिटींच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. सेलिब्रिटींची झगमगतीत बाजू कायम समोर येत असते. पण त्यांच्या आजारांबद्दल फार कमी लोकांना माहिती असतं. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लहानपणापासून गंभीर आजारांचा सामना करत आहेत. सलमान खान याच्यापासून समंथा रुथ प्रभू हिच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटींना आरोग्यासंबंधी समस्या आहेत.

फिटनेस फ्रिक असूनही, सेलिब्रिटी अशा आजारांशी झुंज देत आहेत ज्याबद्दल तुम्ही फारसं ऐकलं नसेल आणि तुम्हाला काही आजारांबद्दल माहिती नसेल. शिवाय काही आजारांवर अद्याप औषधच नाही. तर आज आपण अशाच काही बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे.

वरुण धवनने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत आरोग्याबद्दल मोठा खुलासा केला होता. अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून स्टीबुल हायपोफंक्शन समस्येने त्रस्त आहे. या आजारात व्यक्तीच्या शरीराचा सतत तोल जातो. स्वतःच्या आजाराबद्दल खुद्द अभिनेत्याने खुलासा केला होता.

हे सुद्धा वाचा

दक्षिण भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू देखील गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर आजाराचा सामना करत आहे. समंथा मायोसिटिस नावाच्या आजाराचा सामना करत आहे. स्वतःच्या आजाराचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. मायोसिटिसमुळे थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

अजय देवगन देखील गंभीर आजाराचा सामना करत आहे. अभिनेत्याची पत्नी आणि अभिनेत्री काजोल हिने अजय याच्या आजाराचा खुलासा एक मुलाखतीत केला होता. टेनिस एल्बो व्यतिरिक्त अजय बॉर्डरलाइन ओसीडीचा सामना करत आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान देखील एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. ट्रायजेमिनल न्यूराल्जिया नावाच्या आजाराचा सलमान सामना करत आहे. यामध्ये ट्रायजेमिनल नर्व्हमध्ये असह्य वेदना होतात ज्यामुळे चेहऱ्यापासून मेंदूपर्यंत वेदना जाणवतात.

अभिनेत्री सोनम कपूर देखील डायबिटीजचा सामना करत आहे. लहानपणापासून डायबिटीजचा सामना करत असल्याचा खुलासा अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता. सोनम गेल्या अनेक वर्षांपासून योग करत स्वतःला फिट ठेवत आहे.

MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.