मलायका अरोरा ‘या’ गोष्टीमुळे चिंतेत, अखेर ‘त्या’ गोष्टीवर केले भाष्य, म्हणाली, आपण..

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मलायका अरोरा हिने मोठा काळ गाजवला आहे. मलायका अरोरा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना मलायका अरोरा दिसते. आता नुकताच मलायका अरोराने मोठा खुलासा केलाय.

मलायका अरोरा 'या' गोष्टीमुळे चिंतेत, अखेर 'त्या' गोष्टीवर केले भाष्य, म्हणाली, आपण..
Malaika Arora
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 12:30 PM

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिचे काही दिवसांपूर्वीच फोटो व्हायरल होताना दिसले. या फोटोमध्ये मलायका अरोरा ही चक्क अरबाज खान याच्या घरी पोहचली. यावेळी मलायका अरोरा हिच्यासोबत मुलगा अरहान खान हा देखील होता. पापाराझी यांच्याकडून दुर्लक्ष करून जाताना मलायका अरोरा दिसली. मलायका अरोरा कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. हेच नाही तर मलायका अरोरा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही मलायका अरोरा दिसते. आता नुकताच मलायका अरोराने मोठे भाष्य केले.

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याला उष्माघाताचा त्रास झाला. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले, हेच नाही तर तब्बल 30 तास शाहरुख खानला रूग्णालयात राहावे लागले. आता शाहरुख खान याला डिस्चार्ज मिळाला असून त्याला मुंबईला आणले गेले. अहमदाबादचे ऊन शाहरुख खान याला सहन झाले नाही. केकेआरच्या सामन्यासाठी शाहरुख खान अहमदाबादला पोहचला होता.

आता याबद्दलच मलायका अरोरा ही बोलताना दिसली. नुकताच मलायका अरोरा हिला शाहरुख खान याला झालेल्या उष्माघाताबद्दल विचारण्यात आले. शाहरुख खानची तब्येत बिघडल्यानंतर मलायका अरोराने चिंता व्यक्त केली, ती चिंतेत दिसली. मलायका अरोरा म्हणाली की, आपण पर्यावरणाबद्दल अधिक जागरूक असायला हवे. सध्या ऊन खूप वाढले आहे. पर्यावरणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

यासोबत मलायका अरोरा ही उष्माघात टाळण्यासाठी काय करायला हवे, हे सांगताना देखील दिसली. मलायका अरोरा म्हणाली की, आपण हायड्रेटेड राहायला हवे. भरपूर पाणी प्या. थंड आणि आरामदायक कपडे घाला. हेच नाही तर उन्हाळ्यात बाहेर पडताना त्वचेला सनस्क्रीन लावा. जर सनस्क्रीन लावली नाही तर त्वचेचे खूप नुकसान होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.

उष्माघाताचा मोठा फटका शाहरुख खानला बसला होता. आता शाहरुख खानची तब्येत स्थिर असल्याचे देखील सांगितले जातंय. मलायका अरोरा ही कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसते. मलायका अरोरा कायमच जिमबाहेर स्पाॅट होताना दिसते. मलायका अरोरा हिने काही दिवसांपूर्वीच तिच्या हेल्दी नाश्त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.