दिवंगत अभिनेत्याच्या पत्नीचं निधन; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Bollywood : कर्करोगामुळे 27 वर्षांपर्वी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास, आता पत्नीच्या निधनानंतर कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर... दिवंगत अभिनेत्याच्या पत्नीच्या निधनाचं कारण अद्यार अस्पष्ट... सध्या सर्वत्र सेलिब्रिटीच्या निधनाची चर्चा

दिवंगत अभिनेत्याच्या पत्नीचं निधन; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 1:08 PM

मुंबई | 2 डिसेंबर 2023 : बॉलिवूड विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते राजकुमार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजकुमार यांच्या पत्नी गायत्री पंडीत यांचं निधन झालं आहे. 28 नोव्हेंबर रोजी गायत्री पंडीत यांनी अखेरचा श्वास घेतला. गायत्री पंडीत यांच्या निधनाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. गायत्री पंडीत यांच्या निधनामुळे कुटुंबात दुःखाचं वातावरण आहे. राजकुमार यांचं निधन 27 वर्षांपू्र्वी झालं आहे. कर्करोगामुळे राजकुमार यांचं निधन झालं होतं. 3 जुलै 1996 मध्ये राजकुमार यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

राजकुमार यांच्या पत्नी गायत्री पंडित यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वृद्धापकाळाने गायत्री पंडीत यांचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गायत्री पंडीत यांच्या निधनाची चर्चा सुरु आहे. राजकुमार आणि गायत्री यांना पारू राज कुमार, पाणिनी राज कुमार आणि मुलगी वास्तविकता पंडित अशी तीन मुले आहेत.

आधी वडील आणि आता आईचं निधन झाल्यामुळे राजकुमार आणि गायत्री यांच्या मुलांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण गायत्री पंडीत यांना श्रद्धांजली वाहत आहेत. राजकुमार यांच्या पत्नी म्हणून गायत्री पंडीत झगमगत्या विश्वात ओळख होती. पण आता त्यांच्या निधनांमुळे बॉलिवूड विश्वातील अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

हे सुद्धा वाचा

राजकुमार यांचे सिनेमे

राजकुमार यांचं जन्म कुलभूषण पंडीत यांच्या घरी झाला होता. बॉलिवूडमधील राजकुमार यांचा प्रवास देखील फार खास होता. अनेक हीट सिनेमे राजकुमार यांनी बॉलिवूडला दिले. राजकुमार यांच्याबद्दल हैराण करणारी गोष्ट म्हणजे, ते इन्स्पेक्टर म्हणून नोकरी करत होते. पण पोलिसांतील नोकरी सोडून त्यांनी मुंबई याठिकाणी येवून बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली.

राजकुमार यांनी ‘तिरंगगा’, ‘सौदागर’, ‘हीर रांझा’, ‘पाकिझा’, ‘मदर इंडिया’, ‘वक्त’, ‘नील कमल’, ‘जवाब’, ‘लाल पत्थर’, ‘झिंदगी’, ‘काजल’, ‘राज तिलक’, ‘साजीश’, ‘घराणा’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही चाहते राजकुमार यांचे सिनेमे तितक्याच आवडीने पाहातात. शिवया राजकुमार यांच्यावर चित्रित करण्यात आलेली काही गाणी आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.