‘महिलांसाठी पुरुष म्हणजे…’, घटस्फोटानंतर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

divorce and second marriage | महिलांच्या आयुष्यात पुरुषांचं स्थान काय? घटस्फोटानंतर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं लक्षवेधी वक्तव्य... बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. पण आता ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती वयाच्या 52 व्या वर्षी जगतेय एकटीच

'महिलांसाठी पुरुष म्हणजे...', घटस्फोटानंतर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 2:02 PM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री तर झाली, पण त्यांनी कधीच लग्नाचा विचार केला नाही. तर दुसरीकडे, काही अभिनेत्रींनी त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत संसार तर थाटला, पण नातं फार काळ टिकलं नाही. अशात अभिनेत्रींसमोर एकमेव पर्याय होता, तो म्हणजे घटस्फोट… झगमगत्या विश्वातील अनेक अभिनेत्रींनी घटस्फोटाचा सामना केला आहे. अभिनेत्रींनी घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार केला. पण काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी घटस्फोटानंतर एकटं राहण्याचा विचार केला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे पूजा भट्ट…

पूजा भट्ट आता झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पूजा तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस ओटीटी 12’ नंतर पूजा हिने पुन्हा चाहत्यांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत पूजा हिने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूजा भट्ट हिची चर्चा रंगली आहे.

घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘लोक मला येऊन सांगतात की दुसरं लग्न कर. तू आनंदी राहशील. तू एकटी का राहत आहेस, लग्न का नाही करत? तुझ्या आयुष्यात सर्वकाही चांगलं सुरु आहे… दिसायला देखील तू सुंदर आहेस… या सर्व गोष्टी लोकं येऊन मला सांगतात. पण मला सर्वांना सांगायचं आहे की, मी स्वतःचा सांभाळ करु शकते…’ असं देखील पूजा म्हणाली.

‘लोकं मला म्हणतात तुला आम्ही चांगल्या मुलाला भेटवतो. मी माझ्या आयुष्यात आनंदी असताना दुसरं लग्न का करू. मला कोणासोबत ओळख वाढवायची नाही.. जर देवाला मान्य असेल तर, माझ्या आयुष्यात चांगली व्यक्ती येईल… माझ्या आयुष्यात कोणाला यायचं असेल तर तो येईल.. पण मला असं वाटतं महिलांसाठी पुरुष म्हणजे कोणता उपाय नाही… आपल्याला आपला मार्ग ठरवायचा असतो…’ असं देखील पूजा भट्ट म्हणाली.

अभिनेत्री आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट देखील कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. बिग बॉस ओटीटी शोमध्ये पूजा हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. घटस्फोटाबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं होतं. घटस्फोट माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता.’ असं देखील पूजा म्हणाली होती.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.