Vivek Agnihotri | बॉलिवूडला कोण संपवू शकतं? ‘सत्य कटू आहे पण…’, विवेक अग्निहोत्री यांचं मोठं वक्तव्य
विवेक अग्निहोत्री यांच्या एका ट्विटमुळे सर्वत्र खळबळ..... बॉलिवूडला कोण संपवू शकतं? यावर दिग्दर्शकाचं मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र विवेक यांच्या ट्विटची चर्चा...
मुंबई : ‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री कामय त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. बॉलिवूड स्टार, घराणेशाही, सिनेमे एवढंच नाही तर राजकारणावर देखील विवेक अग्निहोत्री स्वतःचं परखड मत व्यक्त करतात.आपल्या वक्तव्यांमुळे विवेक अग्निहोत्री यांना वादग्रस्त परिस्थितीचा सामना देखील करावा लागतो.. आता देखील विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे… ज्यामुळे विवेक अग्निहोत्री पुन्हा चर्चेत आले आहे… सध्या सर्वत्र विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या ट्विटची चर्चा रंगत आहे. चित्रपट निर्माते गिरीश जोहर यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत विवेक अग्निहोत्री बॉलिवूडला कोण संपवू शकतं.. याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, गिरीश जोहर म्हणाले, ‘बॉक्स ऑफिस कोणालाही सोडत नाही… रिपोर्टनुसार, PVR Inox यांनी Q4FY23 मध्ये अंदाजे 333 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे. त्यांच्या तोट्यामध्ये आणखी 107 कोटी रुपयांनी भर पडली आहे… आता पुढील 6 महिन्यांत जवळपास 50 बंद करण्याची त्यांची योजना आहे!’
Dreaded #BoxOffice is sparing no one… Reportedly, #PVRInox has reported a loss of ₹333crs aprox in Q4FY23, adding to their earlier loss of ₹107crs, now they plan to close around 50 under performing cinemas in the next 6 months !!! #BOTrends
— Girish Johar (@girishjohar) May 15, 2023
गिरीश जोहर यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘बॉलिवूडला फक्त बॉलिवूडच संपवू शकतो… आता बॉलीवूड स्टार, घराणे आत्मपरीक्षण करत नसतील, पण त्यांची किंमत 80 टक्क्यांनी कमी होत आहे आणि R&D आणि लेखणात गुंतवणूक होत आहे… त्यांना कोणीही लाचवू शकत नाही… सत्य कटू आहे…’ असं देखील विवेक अग्निहोत्री म्हणाले आहेत…
Bollywood killing Bollywood. Even if now Bollywood stars, dynasts and kings don’t introspect and cut star prices by 80% and invest it in R&D and writing, nothing will save them. #BitterTruth https://t.co/hBZpomtMgD
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 16, 2023
विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटवर अभिनेत्री कंगना रनौत हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘आपल्या देशात आणखी चित्रपटगृहांची गरज आहे.. आपल्याला आणखी स्क्रिन हव्या आहेत.. फिल्म इंडस्ट्रीसाठी हे चांगले दिवस नाहीत… मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहणं फार महागडं झालं आहे.. मित्र कुटुंबासोबत जाणं म्हणजे मध्यम वर्गीय व्यक्तींसाठी त्यांच्या वेतनातील एक महत्त्वाचा भाग आहे… यावर काम करण्याची अत्यंत गरज आहे…’