फोटोतील चिमुकली बॉलिवूडची ‘लेडी सुपरस्टार’, 80 च्या दशकात राहत होती लिव्ह इनमध्ये, हृदयद्रावक निधनाने खळबळ
80 च्या दशकात लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या अभिनेत्रीचा विवाहित अभिनेत्यावर जडला जीव; 'ती' घटना आणि फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीचं निधन
मुंबई | बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी ८०, ९० च्या दशकात समाजाची पर्वा न करता फक्त आपल्या भावनांना महत्त्व दिलं आणि स्वतःच्या अटी, शर्तींनुसार जीवन व्यतीत केलं. आज ८०, ९० च्या दशकातील अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसल्यातरी त्यांची चर्चा मात्र कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अभिनेत्रींचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील अशाच एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीने ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. पण तिच्या आयुष्यात एक असं वळण आलं, ज्यामुळे अभिनेत्रीला आपले प्राण गमवावे लागले. पण आज इतक्या वर्षांनंतर देखील बॉलिवूडच्या ‘लेडी सुपरस्टार’ला चाहते विसरू शकले नाहीत. फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीला ओळखणं कठीण आहे..
८०, ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण, वैवाहित अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध, लिव्ह ईनरिलेशनशिपमध्ये राहण्याचा घेतलेला निर्णय… इत्यादी गोष्टीमुळे ‘लेडी सुपरस्टार’ चर्चेत राहिली. सध्या सोशल मीडियावर ज्या चिमुकलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री स्मिता पाटील आहेत. स्मिता पाटील आज जिवंत नसल्यातरी त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
स्मिता पाटील यांचे नाव बॉलीवूडच्या सशक्त अभिनेत्रींमध्ये घेतले जाते, ज्यांनी अनेक महिलांवर आधारित सिनेमांमध्ये काम केले. स्मिता पाटील त्यांच्या सिनेमांपेक्षा राज बब्बर यांच्यासोबतच्या नात्यामुळे जास्त चर्चेत होत्या. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पलके’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान राज आणि स्मिता एकमेकांच्या फार जवळ आहे. पण तेव्हा राज बब्बर विवाहित होते.
विवाहित राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली. त्यानंतर राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लिव्ह ईनरिलेशनशिपमध्ये राहण्याचा घेतलेला निर्णय… कालांतराने राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लग्न केलं. लग्नानंतर स्मिता पाटील यांनी एका मुलाला जन्म दिला. पण डिलीव्हरी दरम्यान आलेल्या अडचणींमुळे स्मिता पाटील यांचं हृदयद्रावक निधन झालं..
वयाच्या ३१ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी अखेरच्या श्वास घेतला. राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या मुलाचं नाव प्रतीक बब्बर आहे. प्रतीक बब्बर देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच प्रतीकने सोशल मीडियावर एक पोस्ट करत नाव बदलल्याची घोषणा केली. प्रतीक पाटील बब्बर.. असं नाव असल्याची घोषणा केली..