एकाच सुपरस्टारसोबत दोन्ही बहिणींचं कनेक्शन, मोठीला मिळाला स्टारडम तर छोटीला मृत्यू; या मुलींना ओळखलंत का?
पहिल्या मुलीने तिच्या काळातील सुपरस्टारसोबत लग्न केलं, मात्र तिचा संसार फार काळ टिकला नाही. तर दुसरीने त्याच सुपरस्टार भावोजीसोबत करिअरची सुरुवात केली. योगायोगाची गोष्ट म्हणजे तीच करिअरसुद्धा फार काळ चाललं नाही. तुम्ही या दोन बहिणींनी ओळखू शकलात का?
मुंबई : नशिबाचा खेळ किती विचित्र असतो. आता या दोन निरागस मुलींच्या फोटोला पाहा. हा फोटो बॉलिवूडशी संबंधित कुटुंबातील दोन मुलींचा आहे. या दोघींनी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून नशीब आजमावलं. त्यापैकी एक पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली तर दुसरीला अभिनय फारसा आवडला नाही. पहिल्या मुलीने तिच्या काळातील सुपरस्टारसोबत लग्न केलं, मात्र तिचा संसार फार काळ टिकला नाही. तर दुसरीने त्याच सुपरस्टार भावोजीसोबत करिअरची सुरुवात केली. योगायोगाची गोष्ट म्हणजे तीच करिअरसुद्धा फार काळ चाललं नाही. तुम्ही या दोन बहिणींनी ओळखू शकलात का?
चेहऱ्यावर निरागस हास्य झळकणाऱ्या या दोन मुली डिंपल आणि त्यांची बहीण सिंपल कपाडिया आहेत. डिंपल कपाडियाला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. तिने चित्रपटसृष्टीत सर्वोत्तम काळ पाहिला. ‘बॉबी’सारख्या चित्रपटातून डिंपलने करिअरची सुरुवात केली आणि रातोरात ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. लग्नानंतरही मोठ्या पडद्यावर परतल्यानंतर तिने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. आतासुद्धा ती चित्रपट आणि ओटीटीवर सक्रिय आहे. मात्र तिची बहिण सिंपल कपाडियाचं नशीब इतकं चांगलं नव्हतं. सिंपलने सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावलं, मात्र त्यात तिला यश मिळालं नाही. पडद्यामागे राहून तिने फॅशन डिझायनिंगचं काम सुरू केलं. इथे तिचा हळूहळू जम बसू लागला होता. मात्र तिच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं.
View this post on Instagram
डिंपल कपाडियाने करिअरच्या सुरुवातीलाच त्या काळातील सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं. डिंपलच नव्हे तर, राजेश खन्ना देखील डिंपलच्या प्रेमात वेडे झाले होते. राजेश खन्ना यांनी देखील वेळ न घालवता डिंपलला लग्नासाठी प्रपोज केले. डिंपलनेही त्यांना लगेच हो म्हटले. यानंतर दोघांनीही लवकरच लग्नाची तयारी देखील केली. मात्र लग्नाच्या 9 वर्षांनंतर 1982 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. राजेश खन्ना यांच्यासोबत सुरू झालेला आयुष्याचा नवीन प्रवास फार काळ चालला नाही.
राजेश खन्ना यांचं कनेक्शन सिंपल कपाडियाशीही होतं. तिने 1977 मध्ये अनुरोध या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. यात तिने राजेश खन्ना यांच्यासोबत भूमिका साकारली होती. मात्र तिच्या करिअरची गाडी मध्येच थांबली. त्यानंतर तिने फॅशन डिझायनिंग निवडलं. या क्षेत्रात तिला चांगलं यश मिळत होतं, मात्र आरोग्याने तिची साथ दिली नाही. अखेर कॅन्सरने सिंपल कपाडियाचं निधन झालं.