AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Orhan | कधी सारा, कधी न्यासा तर कधी जान्हवीसोबत दिसणारा ओरहान अंबानींसाठी करतो काम?

बॉलिवूडमधल्या प्रत्येक स्टारकिड्ससोबत त्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये त्याच्याविषयी कुतूहल निर्माण झालं. हा ओरहान नक्की आहे तरी कोण, तो काय काम करतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो इतक्या स्टारकिड्सना ओळखतो तरी कसा, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

Orhan | कधी सारा, कधी न्यासा तर कधी जान्हवीसोबत दिसणारा ओरहान अंबानींसाठी करतो काम?
Janhvi Kapoor and OrhaanImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 02, 2023 | 6:05 PM
Share

मुंबई: बॉलिवूडचे स्टारकिड्स जान्हवी कपूर, सारा अली खान, सुहाना खान, न्यासा देवगण यांच्यासोबत दरवेळी पार्ट्यांमध्ये एक चेहरा पहायला मिळतो. त्या व्यक्तीचं नाव आहे ओरहान अवतरमणी. बॉलिवूडमधल्या प्रत्येक स्टारकिड्ससोबत त्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये त्याच्याविषयी कुतूहल निर्माण झालं. हा ओरहान नक्की आहे तरी कोण, तो काय काम करतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो इतक्या स्टारकिड्सना ओळखतो तरी कसा, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

ओरहान हा त्याच्या बॉलिवूड स्टारकिड्सच्या मित्रमैत्रिणींमध्ये ओरी म्हणून ओळखला जातो. त्याचे सततचे पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ पाहून तो काही काम करतो की नाही, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

ओरीने सांगितलं की तो कोणताही 9 ते 5 वाला जॉब करत नाही. “मी काम करतो, मात्र ते माझ्यावर अवलंबून आहे. मी योगा, मेडिटेशन हे सर्वपण करतो”, असं तो म्हणाला. मात्र ओरीच्या लिंक्ड इन प्रोफाइलच्या बायोमध्ये लिहिलं आहे की तो रिलायन्स कंपनीच्या चेअर पर्सन ऑफिसमध्ये स्पेशल प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो.

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

ओरीची सर्व स्टारकिड्ससोबत मैत्री आहे. मात्र तो स्वत:ला या सेलिब्रिटींचा मित्र नाही मानत. ओरीने म्हटलंय की “हे सर्व माझे मित्र यासाठी नाहीत कारण ते सेलिब्रिटी आहेत. ते माझ्यासोबत शाळा आणि कॉलेजमध्ये एकत्र शिकले आहेत, म्हणून ते सर्वजण माझे खास मित्र आहेत.”

“तुम्ही मला बॉलिवूड सेलिब्रिटींचा मित्र म्हणता. मात्र माझ्यासाठी ते त्याहून खास आहेत. त्यांच्यासोबत मला कायम मैत्री ठेवायची आहे. माझ्यासाठी ते फक्त सेलिब्रिटी नाहीत”, असं तो म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

ओरहानला बॉलिवूड चित्रपटांचे ऑफर्सही आले आहेत. त्याने स्वत:च या गोष्टीचा खुलासा केला आहे. मात्र हिंदी भाषा नीट बोलता येत नसल्याने त्याने चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.