Oscars Awards | आरआरआर चित्रपटाच्या टिमवर काैतुकांचा वर्षाव, रजनीकांत यांनी म्हटले…
आरआरआर चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार जिंकल्याने आज सर्वत्र आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला पुरस्कार मिळाला आहे. आता आरआरआर चित्रपटाच्या टिमचे काैतुक केले जात आहे.
मुंबई : एसएस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने सर्वात अगोदर बॉक्स ऑफिसवर तूफान अशी कामगिरी केली आणि नंतर थेट ऑस्कर पुरस्कार जिंकला. या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार (Oscars Awards) मिळाला. आता आरआरआर (RRR) चित्रपटाच्या टिमचे सर्वत्र काैतुक होताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आरआरआर चित्रपटाच्या टिमला शुभेच्या दिल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त आरआरआर चित्रपटाचीच हवा बघायला मिळत आहे. चाहत्यांमध्येही नाटू नाटू (Naatu Naatu) गाण्याला पुरस्कार मिळाल्याने आनंद दिसतोय.
बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी एसएस राजामौली यांचे अभिनंदन केले आहे. करण जोहर याने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. करण जोहर म्हणाला की, नाटू नाटू गाण्याचे नाव ऑस्कर पुरस्कारमध्ये घेतल्यानंतर मी बेडवर उभे राहून उड्या मारल्या. भारतामधील प्रत्येक व्यक्तीला ऑस्कर पुरस्कार भारताच्या चित्रपटाने जिंकल्यामुळे आनंद झालाय.
आरआरआर चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर आता चिरंजीवी यांनीही एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, जगातील सर्वात उंचावर नाटू नाटू, असे लिहिले असून काही टाळ्या वाजवणारे इमोजी देखील त्यांनी शेअर केले आहेत. आता चिरंजीवीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
रजनीकांत यांनीही नाटू नाटू गाण्याचे काैतुक करत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. श्री कीरवानी, राजामौली आणि कार्तिकी गोंसाल्वेस यांनी ऑस्कर पुरस्कार जिंकल्याबद्दल मनापासून शुभेच्छा…आता रजनीकांत यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
आरआरआर चित्रपटाचे नाव पुरस्कार सोहळ्यात घेतल्यानंतर चित्रपटाची संपूर्ण टिम जल्लोष करताना दिसली. आरआरआर चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक बाॅलिवूड अभिनेत्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र, पुरस्कार सोहळ्यामध्ये आरआरआर चित्रपटाचे नाव होस्टने घेतल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला.
आरआरआर चित्रपटाचे नाव घेतल्यानंतर आरआरआर हा बाॅलिवूड चित्रपट असल्याचे थेट पुरस्कार सोहळ्यात सुत्रसंचालन करणारी व्यक्ती म्हणाली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आरआरआर चित्रपटाला टाॅलिवू़ड ऐवजी थेट बाॅलिवूड चित्रपट म्हटल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केलाय आणि हा बाॅलिवूड चित्रपट नसून टाॅलिवूड चित्रपट असल्याचे म्हटले आहे.