Video | रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा यांच्या डान्सवर चाहते फिदा, थेट केली मोठी मागणी
रणवीर सिंह हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रणवीर सिंह याचा काही दिवसांपूर्वी सर्कस हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह याचे चित्रपट फ्लाॅप जात आहेत. आता प्रियांका आणि रणवीर सिंह यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
मुंबई : नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्यात बाॅलिवूड (Bollywood) कलाकारांचा जलवा बघायला मिळाला. या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला बाॅलिवूडपासून हाॅलिवूडपर्यंत प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने देखील हजेरी लावली. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये येऊन गेली होती.
कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्यानिमित्त प्रियांका चोप्रा ही पहिल्यांदाच मुलगी मालती मेरी हिला भारतामध्ये घेऊन आलीये. यावेळी प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनस देखील आलाय. प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये आल्यानंतर विमानतळावरील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा हिच्या मुलगीची झलकही चाहत्यांना बघायला मिळाली.
नुकताच सोशल मीडियावर नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्यातील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा हे दिसत आहेत. विशेष म्हणजे तब्बल आठ वर्षांनंतर यांची जोडी सोबत धमाल करताना दिसत आहे. प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंह हे धमाकेदार पध्दतीने डान्स करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
गल्लां गूड़ियां या गाण्यावर तूफान डान्स करताना प्रियांका चोप्रा रणवीर सिंह दिसले. विशेष म्हणजे त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले आहे की, या जोडीला परत एकदा धमाल करताना बघायचे आहे.
एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने धक्कादायक खुलासा करत म्हटले की, मला बाॅलिवूडमध्ये कोपऱ्यात ढकलले जात होते. मला चित्रपटांमध्ये काम दिले जात नव्हते. यामुळे माझे त्या लोकांसोबत सारखे वाद व्हायचे. मला त्यांच्यासारखे राजकारण जमले नाही आणि मी थांबण्याचा निर्णय घेतला.
काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाच्या कामानिमित्त तब्बल तीन वर्षांनंतर प्रियांका चोप्रा ही मुंबईत दाखल झाली होती. यावेळी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत मुंबई मेरी जान म्हणत तिने चाहत्यांना आपण भारतामध्ये आलो याची माहिती दिली. यानंतर बरेच दिवस प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये होती. मात्र, त्यावेळी तिने तिच्या मुलीला भारतात आणले नव्हते.