‘आमिर खान’च्या लेकीने फोटो शेअर करत सांगितले कार्यक्रमामधील सर्वांत आनंदी असलेल्या व्यक्तीचे नाव
लेकीच्या साखरपुड्यामध्ये आमिर खान खास लूकमध्ये होता, इतकेच नाही तर मस्त डान्स करताना देखील आमिर खान दिसला.
मुंबई : आमिर खानची लेक इरा खान कायमच चर्चेत असते. नुकताच इरा खानचा साखरपुडा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत मुंबईमध्ये झाला आहे. लेकीच्या साखरपुड्यामध्ये आमिर खान खास लूकमध्ये होता, इतकेच नाही तर मस्त डान्स करताना देखील आमिर खान दिसला. नुपूर आणि इरा गेल्या काही दिवसांपासून ऐकमेकांना डेट करत होते. इतकेच नाही तर इरा कायमच सोशल मीडियावर नुपूरसोबतचे काही फोटोही शेअर करत होती. आता चाहते इरा आणि नुपूरच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
साखरपुड्यातील काही खास फोटो नुकताच इराने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये इरा आणि नुपूरचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हा साखरपुडा पार पडला.
इराच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर अगोदरच तूफान व्हायरल झाले होते. यामध्ये इराची आई, आमिर खान, आमिर खानची आई असे जवळचे नातेवाईक या फोटोंमध्ये दिसत आहेत.
इराने तिच्या इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत आणि सर्व फोटो खूप व्हायरल होत आहेत. इराच्या साखरपुड्यामधील फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
इराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने तिच्या साखरपुड्यामध्ये सर्वांत जास्त आनंदी कोण होते, त्याचे नाव सांगितले आहे.
इरा आणि नुपूर यांच्या साखरपुड्यामध्ये त्यांच्यापेक्षाही जास्त आनंदी नुपूरची आई असल्याचे तिने आपल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यासोबतच तिने अनेक फोटोही शेअर केले आहेत.