Lal Singh Chaddha | आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटातील ‘तुर कलेयां’ गाणे रिलीज, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

लाल सिंग चड्ढा’च्या तूर कलेयांमध्ये आमिरची मुख्य भूमिका असलेल्या लाल सिंग चड्ढाचा स्वतःवर प्रेम करण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हे गाणे ऑडिओ फॉरमॅटमध्ये रिलीज करण्यात आले आहे, मात्र चित्रपटाच्या टीमने हे गाणे वेगवेगळ्या ठिकाणी शूट केल्याचे बोलले जात आहे.

Lal Singh Chaddha | आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटातील 'तुर कलेयां' गाणे रिलीज, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 9:31 AM

मुंबई : आमिर खानचा (Aamir Khan) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’चे चौथे गाणे ‘तुर कलेयां’ रिलीज झाले आहे. प्रीतमने या गाण्याला संगीत दिले असून अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणे लिहिली आहे. अरिजित सिंग, शादाब आणि अल्तमाश यांचा या गाण्याला (Song) दमदार आवाज आहे. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटातील चौथे गाणे रिलीज (Release) झाल्याने चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झालीयं. तुर कलेयां हे एक सुंदर गाणे आहे जे लाल सिंग चड्ढा यांच्या भावनेला रूप देते आणि स्वतःसाठी चांगले भविष्य घडवण्याच्या भावनेवर लक्ष केंद्रित करते.

इथे पाहा आमिर खानचे तुर कलेयां गाणे

तुर कलेयांमध्ये आमिरची मुख्य भूमिका

लाल सिंग चड्ढा’च्या तुर कलेयांमध्ये आमिरची मुख्य भूमिका असलेल्या लाल सिंग चड्ढाचा स्वतःवर प्रेम करण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हे गाणे ऑडिओ फॉरमॅटमध्ये रिलीज करण्यात आले आहे, मात्र चित्रपटाच्या टीमने हे गाणे वेगवेगळ्या ठिकाणी शूट केल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटासाठी शूट केलेला हा सर्वात लांब सीक्वेंस असल्याचे सांगितले जात आहे. ‘तुर कलियां’च्या शूटिंगपूर्वी आमिर खानला गुडघेदुखीचा त्रास होत होता.

हे सुद्धा वाचा

तीन गाणे अगोदरच रिलीज

तुर कलेयां हे लाल सिंग चड्ढाचे चौथे गाणे आहे. याआधी ‘कहानी’ चित्रपटातील तीन गाणी, ‘मैं की करो?’ आणि ‘फिर ना ऐसी रात आयेगी’ रिलीज झाले आहेत. या गाण्यांना खूप पसंती दिली जात आहे. मागील गाण्यांप्रमाणेच ‘तूर कलेयां’ देखील व्हिडीओविना रिलीज करण्यात आले आहे. व्हिडीओ विना गाणी प्रसिद्ध करणे हे आता नेहमीचेच झाले आहे. यामागे हे देखील एक कारण आहे की अनेक वेळा चाहत्यांना गाण्यांच्या व्हिडिओमधून चित्रपटाची स्टोरी कळण्याची शक्यता असते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.