Pathaan | आमिर खान याची बहीण निखत खान पठाण चित्रपटामध्ये आहे महत्वाच्या भूमिकेत, शाहरुख खान याच्या…
पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. २०२३ हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत खास नक्कीच आहे.
मुंबई : शाहरुख खान याच्या चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग करत एक नवे रेकाॅर्ड तयार केले आहे. शाहरुख खान याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट आतापर्यंतच्या बाॅलिवूड चित्रपटामधील सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे. हिंदी भाषेमध्ये चित्रपटाने जबरदस्त कामगिरी करत ओपनिंग डेलाच ५५ कोटींची कमाई केली. जगभरातून पठाण चित्रपटाने ओपनिंग डेला १०० कोटींचे कलेक्शन केल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मात्र, असे असले तरीही पठाण चित्रपटाला आरआरआर चित्रपटाचे रेकाॅर्ड मोडण्यात अपयश आले. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण या चित्रपटामध्ये एक वेगळाच अंदाज बघायला मिळतोय. चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर इतका मोठा वाद झाल्यानंतरही चित्रपटाने धमाका केलाय. जगभरातून चाहते पठाण या चित्रपटाला प्रेम देताना दिसत आहेत.
शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. २०२३ हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत खास नक्कीच आहे. कारण या वर्षामध्ये शाहरुख खान याचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
चार वर्षांनंतर शाहरुख खान याने पुनरागमन केले असून पठाण हा सुरूवातीचाच चित्रपट हीट ठरलाय. पठाणनंतर लगेचच शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पठाण चित्रपटातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडत आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? आमिर खान याची बहीण देखील पठाण या चित्रपटामध्ये अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहे.
पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्या आईच्या भूमिकेत असलेली निखत खान ही आमिर खान याची बहीण आहे. पठाण चित्रपटामध्ये निखत खान हिने शाहरुख खान याच्या आईची भूमिका निभावली आहे.
मुळात चित्रपटामध्ये पठाण म्हणजेच शाहरुख खान हा अनाथ असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, पठाणचे पालन पोषण हे निखत खान हिने केल्याचे दाखवले आहे. निखत हिने यापूर्वीही अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मिशन मंगलमध्येही महत्वाच्या भूमिकेत आमिर खान याची बहीण होती.
आजही चित्रपटाने चांगली कामगिरी केल्याचा अंदाज आहे. प्रजासत्ताक दिनाचा फायदा पठाण चित्रपटाला झाल्याचा एक अंदाज आहे. आज काही शहरांमध्ये पठाण चित्रपट हाऊसफुल असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.