Abhishek Bachchan Birthday : नकली हिऱ्याची अंगठी घालून प्रपोज, अभिषेक ऐश्वर्याची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’!

Abhishek Bachchan Birthday : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सुपुत्र अभिषेक बच्चन आज आपला 46 वा वाढदिवस साजरा करतोय. बॉलिवूडच्या शहनशहाचा मुलगा असूनही अभिषेक साधा-सरळ आहे. माणूस म्हणूनही तो खूप मोठा असल्याचं त्याचे अनेक सेलिब्रेटी मित्र सांगतात.

Abhishek Bachchan Birthday : नकली हिऱ्याची अंगठी घालून प्रपोज, अभिषेक ऐश्वर्याची 'प्यारवाली लव्हस्टोरी'!
अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 8:10 AM

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा सुपुत्र अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आज आपला 46 वा वाढदिवस साजरा करतोय. बॉलिवूडच्या शहनशहाचा मुलगा असूनही अभिषेक साधा-सरळ आहे. माणूस म्हणूनही तो खूप मोठा असल्याचं त्याचे अनेक सेलिब्रेटी मित्र म्हणतात. मागच्या ३० वर्षापासून बच्चन कुटुंबाला मोठं स्टारडम आहे. पण अभिषेकच्या वागण्या-बोलण्यात ते स्टारडम कधीही दिसून येत नाही. सेलिब्रेटी मित्रांमध्ये गेल्यावर अभिषेक सगळं विसरुन हसतो, खेळतो, मजा मस्ती करत गप्पा मारतो. अभिषेकचा हा अंदाज कपील शर्मा शोमध्ये अनेकांनी पाहिला आहे, रितेश देशमुखसोबत त्याचा खास दोस्ताना आहे. रितेश अनेकदा अभिषेकची तोंडभरुन स्तुती करत असतो. अभिषेकचं फिल्मी करिअर म्हणावं असं यशस्वी ठरलं नाही. त्याला वडिलांसारखं काम जमलं नाही. अनेकदा लोक त्याच्यावर अशा प्रकारची शेरेबाजी करत असतात. पण अभिषेक टीकाकारांना उत्तर न देता आपल्या कामात व्यस्त असतो. शेवटी प्रयत्न करत राहणं हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे, असं तो सांगतो. आज आपल्या लाडक्या लिटिल बच्चन साहेबांचा वाढदिवस असल्याने चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतायत. अभिषेकच्या आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण घटनांना उजाळा देतायत. आज आम्ही तुम्हाला त्याच्या आयुष्यातील असाच एका महत्त्वपूर्ण प्रसंग सांगणार आहोत, ते म्हणजे अभिषेक-ऐश्वर्याचं लग्न, त्यांच्या लग्नाची खास गोष्ट….!

अभिषेक ऐश्वर्याचं जमलं कसं?

अभिषेक ऐश्वर्याच्या लग्नाचा इंट्रेस्टिंग किस्सा आहे. सगळ्यांना वाटतं की अभिषेक ऐश्वर्याचं अॅरेंज मॅरेज आहे. पण तसं नाहीय. त्यांचं लव्ह मॅरेज आहे. अभिषेकने 2007 साली न्यूयॉर्कमधील एका हॉटेलच्या बाल्कनीत ऐश्वर्याला प्रपोज केलं. नकली हिऱ्याची अंगठी घालून अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं. ऐश्वर्यानेही अभिषेकला अधिक विचार न करता होकार दिला.

उमरान जान या चित्रपटादरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्याची ओळख झाली होती. ओळखीचं रुपांतर फार चांगल्या मैत्रीत झालं. काही दिवस गेल्यानंतर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज करण्याचं ठरवलं. प्लॅननुसार अभिषेकने तिला प्रपोज केलं. मग तिनेही होकार देत आयुष्यभर ‘एक दुजे के लिए’ राहण्याचं वचन दिलं. दोघांच्याही घरी दोघांनीही आपली प्रेमकहाणी सांगितली. घरच्यांच्या संमतीने दोघांनी विवाह केला.

दोघांची मॅच्युअर लव्हस्टोरी

अभिषेक ऐश्वर्याच्या लग्नाविषयी अनेकांना क्युरॅसिटी होती. त्यांचं जमलं कसं? असा अनेकांना प्रश्न होता. याच प्रश्न 2014 मध्ये ‘कॉफी विथ करण’ (coffee with karan) या शोमध्ये अभिषेकला विचारला गेला. त्यावर, ऐश्वर्यानं मी अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे किंवा मी स्टार आहे म्हणून लग्न केलेलं नाही. तसंच मी सुद्धा ती जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे किंवा खूप मोठी स्टार आहे म्हणून तिच्याशी लग्न केलेलं नाही.आम्ही व्यक्ती म्हणून एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्याचं अभिषेक म्हणाला.

अभिषेक आणि ऐश्वर्याची ओळख १९९७ साली झाली. दोघांनी पहिल्यांदा २००० मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम में’ या चित्रपटात एकत्र काम केलं. त्यानंतर २००३ मध्ये ‘कुछ ना कहो’ , त्यानंतर २००५ साली बंटी और बबली, अशा चित्रपटांत अभिषेक ऐश्वर्याने एकत्र काम केलं.

संबंधित बातम्या

बच्चन परिवारावर पुन्हा संकट, जया बच्चन यांना कोरोनाची लागण, करण जोहरने सिनेमाचं शूटिंग थांबवलं

राज कुंद्राचं खास गिफ्ट, 38 कोटींचा फ्लॅट शिल्पा शेट्टीच्या नावे केला

तिहार जेलमधून सुकेशचं पत्र, जॅकलिनसोबत प्रेमाची कबुली, ‘होय, आम्ही रिलेशनशीपसोबत होतो!’

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.