Shamita Shetty: हे ही दिवस जातील… कठीण काळात शमिता शेट्टीचा शिल्पाला भक्कम आधार

शिल्पाच्या या कठीण काळात तिची बहीण शमिता शेट्टीनं तिला प्रोत्साहन दिलं आहे. शमितानं शिल्पाच्या हंमगा 2 या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आणि आपल्या बहिणीसाठी एक खास संदेशही लिहिला आहे. (Shamita Shetty's special post for Shilpa Shetty)

Shamita Shetty: हे ही दिवस जातील... कठीण काळात शमिता शेट्टीचा शिल्पाला भक्कम आधार
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 7:01 PM

मुंबई : शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) कोठडीत आहे. शुक्रवारी त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी पोहोचले होते. महत्त्वाचं शिल्पाचा ‘हंगामा 2’ हा चित्रपट त्याच दिवशी रिलीज झाला आहे आणि तिला या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता होती. मात्र तिला हा दिवस साजरा करता आला नाही.

शिल्पाच्या या कठीण काळात तिची बहीण शमिता शेट्टीनं तिला प्रोत्साहन दिलं आहे. शमितानं शिल्पाच्या हंमगा 2 या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आणि आपल्या बहिणीसाठी एक खास संदेशही लिहिला आहे.

पाहा पोस्ट

शमितानं लिहिलं आहे की, ‘हंगामा 2 साठी ऑल द बेस्ट मुन्की. मला माहित आहे की तु या चित्रपटासाठी खूप परिश्रम केलेत आणि तसेच उर्वरित टीमनं ही प्रचंड मेहनत घेतली आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. आयुष्यात तु अनेक चढउतार पाहिले आहेत आणि एक गोष्ट मला माहिती आहे की तु खूप स्ट्राँग आहेस. हंगामा 2 च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा.

राज यांच्या अटकेचा परिणाम शिल्पाच्या चित्रपटावर होणार?

राजच्या अटकेनंतर शिल्पाच्या चित्रपटावर त्याचा परिणाम होणार नाही असं बोललं जात होतं. पण चित्रपटाचे निर्माते रतन जैन एका मुलाखतीत म्हणाले, ‘या प्रकरणात हमगा 2 चा काय संबंध आहे? अभिनेत्री नाही तर शिल्पाच्या पतीच्या विरोधात खटला चालू आहे. ती या चित्रपटाची एक कलाकार आहे जिनं खूप कष्ट केले आहेत. जेव्हा याला काहीही अर्थ नाही जेव्हा लोक तिचं नाव ओढत असतात ही फार वाईट गोष्ट आहे.

आम्ही एक चांगला चित्रपट बनवला आहे आणि तोही चांगल्या हेतूने. हा चित्रपट शिल्पा शेट्टी वादामुळे नाही तर त्यातील आशयांमुळे लोक पाहतील. त्यामुळे या क्षणी अस्तित्त्वात असलेल्या परिस्थितीचा चित्रपटावर परिणाम होणार नाही.

शिल्पा 14 वर्षानंतर परतली

शिल्पा शेट्टी हमगा 2 च्या माध्यमातून 14 वर्षानंतर कमबॅक करत आहे. आत्तापर्यंत तिला या चित्रपटाच्या गाण्यांमध्ये पाहिलं गेलं होतं, मात्र ती अनेक दिवसांपासून अभिनयापासून दूर होती. आपल्या कमबॅकबद्दल शिल्पा खूप उत्साही होती आणि ती म्हणाली होती की या चित्रपटाची कहाणी वेगळी आहे म्हणून प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडणार आहे.

संबंधित बातम्या

ज्या महागड्या लिपस्टिकमुळे आला होता चोरीचा आळ, त्याच ब्रँडने प्रोडक्ट लाँचची विनंती केली! वाचा अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचा किस्सा

गेहना वशिष्ठच्या अटकेनंतर घाबरला होता राज कुंद्राचा पीए उमेश कामत, वाचा साथीदार यश ठाकूरसोबतचं संभाषण

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.