Naseeruddin Shah | नसीरुद्दीन शाह यांनी केली बॉलिवूड इंडस्ट्रीवर सडकून टिका, म्हणाले सर्व धर्मांची खिल्ली उडवली…
नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या विधानांमुळे कायमच चर्चेत राहतात. बऱ्याच वेळा त्यांना टिकेचा सामनाही करावा लागतो. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी आपला मोर्चा हा थेट बाॅलिवूड चित्रपटांकडे वळवला आहे.
मुंबई : बाॅलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांच्या ताज-डिवाइडेड बाय ब्लड या आगामी वेब सीरिजचा नुकताच ट्रेलर रिलीज झालाय. मात्र, यामुळे नसीरुद्दीन शाह हे चर्चेत नसून त्यांच्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे ते प्रचंड चर्चेत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या निशाण्यावर दुसरे तिसरे कोणी नसून बाॅलिवूड इंडस्ट्री आहे. त्यांनी बाॅलिवूडच्या एका मोठ्या विषयाला हात घालत सडेतोड टिका केलीये. एका प्रकारे त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून बाॅलिवूड इंडस्ट्रीला आरसा दाखवण्याचे काम केले. कशाप्रकारे बाॅलिवूड चित्रपटांमध्ये एकच गोष्ट सारखीच परत परत दाखवली जाते, यावर त्यांनी भाष्य केले आहे. आता नसीरुद्दीन शाह यांचा हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या विधानांमुळे कायमच चर्चेत राहतात. बऱ्याच वेळा त्यांना टिकेचा सामनाही करावा लागतो. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी आपला मोर्चा हा थेट बाॅलिवूड चित्रपटांकडे वळवला आहे. काहींनी नसीरुद्दीन शाह यांनी केलेल्या विधानांचे समर्थन देखील केले आहे.
व्हिडीओमध्ये नसीरुद्दीन शाह म्हणताना दिसत आहे की, 100 वर्षांपासून सतत बॉलिवूड चित्रपटांमध्ये प्रत्येक समाजाची खिल्ली उडवली जात आहे. ख्रिश्चन, शीख, मुस्लीम अशा सर्वच धर्मांची खिल्ली बाॅलिवूड चित्रपटांमधून उडवली जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व 100 वर्षांपासून होत आहे आणि ही एक प्रकारची परंपरा बनली आहे.
“It is our national custom to laugh at others’ miseries. We can’t laugh at ourselves.” -Naseeruddin Shah
Thoughts? pic.twitter.com/KGmMpMxeLO
— Som Shekhar (@somshekharsom) February 24, 2023
पुढे नसीरुद्दीन शाह म्हणाले, जवळपास 100 वर्षांपासून चित्रपट तयार केले जात आहेत आणि तेंव्हापासूनच धर्माची खिल्ली उडवली जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे अजूनही सुरूच आहे. आपल्याला हसण्याची आणि दुसऱ्याच्या त्रासाची मजाक उडवण्याची सवय आहे. नसीरुद्दीन शाह यांनी प्रश्न विचारल म्हटले, आतापर्यंत बाॅलिवूड चित्रपटांनी कोणत्या धर्माला सोडले आहे, कोणता समाज वाचवला हे आता तुम्हीच सांगा?
बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये शीख धर्माच्या लोकांची मजाक उडवली जाते. दुसरीकडे पारशी आणि ख्रिश्चनांची देखील चेष्टा केली जाते. पुढे नसीरुद्दीन शाह म्हणाले, आपण नेहमीच चित्रपटांमध्ये बघितले असेल की, एक मुस्लिम नेहमीच चांगला आणि प्रामाणिक मित्र असतो, जो शेवटी हिरोचा जीव वाचवण्याच्या नादामध्ये मरतो.
नसीरुद्दीन शाह यांनी थेट बाॅलिवूड चित्रपट 100 वर्षांपासून हेच करत आल्याचे देखील म्हटले आहे. 100 वर्षांपासून तेच तेच चित्रपट बनवत असल्याचे देखील नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले आहे. आता नसीरुद्दीन शाह यांच्या बाॅलिवूड चित्रपटांच्या टिकेवरून अनेक चर्चांना उधाण फुटले आहे.