सबका बदला लेगा… पत्नीचं आधीच लग्न झालं होतं, नवाजुद्दीन याचा गंभीर आरोप; पत्नी आणि भावाविरोधात मानहानीचा दावा

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीे त्याची आधीची पत्नी आणि भावाविरोधात 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. या दोघांवरही त्याने 21 कोटी रुपये हडपल्याचा आरोपही केला आहे.

सबका बदला लेगा... पत्नीचं आधीच लग्न झालं होतं, नवाजुद्दीन याचा गंभीर आरोप; पत्नी आणि भावाविरोधात मानहानीचा दावा
nawazuddin siddiqui Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 7:06 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने अखेर कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहे. आपल्याच सख्ख्या भावाविरोधात आणि आधीच्या पत्नीविरोधात नवाजुद्दीन कोर्टात गेला आहे. भाऊ शम्सुद्दीन आणि आधीची पत्नी अंजना पांडेय यांच्याविरोधात नवाजने 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. या दोघांनीही आपली बदनामी केली असल्याचा आरोप त्याने केला आहे. तसेच दोघांकडून आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचंही त्याने म्हटलं आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीचे वकील सुनील कुमार यांनी जस्टिस रियाज छागला यांच्या कोर्टात हा मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणावर आता 30 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल आणि आपली बदनामी होईल, असं कोणतंही विधान करण्यापासून आपली आधीची पत्नी आणि भावाला रोखण्यात यावं. तसेच माझी बदनामी होईल असा कोणताही मजकूर सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफार्मवर शेअर करण्यापासून त्यांना रोखलं जावं. तसे आदेश या दोघांना देण्यात यावेत, अशी मागणी या याचिकेतून नवाजने केली आहे.

हे सुद्धा वाचा

मॅनेजर म्हणून नियुक्त केलं

या याचिकेत नवाजने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 2008मध्ये भाऊ शम्सुद्दीन याने आपण बेरोजगार असल्याचं सांगितलं. तेव्हा त्याला मी माझा मॅनेजर म्हणून नियुक्त केलं. इन्कम टॅक्स रिटर्न, ऑडिटिंग, जीएसटी फायलिंग आदी सर्व कामे शम्सुद्दीनवर सोडण्यात आले होते. तसेच मी फक्त सिनेमावर फोकस केला होता. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम, सही केलेले चेकबुक, बँकेचे पासवर्ड, ईमेल अॅड्रेसही भावाकडे सोपवण्यात आल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

भावाची बेईमानी सुरू

एवढं सर्व भावाकडे विश्वासाने सोपवूनही भावाने बेईमानी सुरू केली. त्याने पैशात हेराफेरी सुरू केली. सिनेमाच्या कामात व्यस्त असल्यामुळे ट्रँझेक्शन पासून बँकेशी कोर्डिनेट करण्यापर्यंतचा वेळ मिळत नव्हता. एकदा भावाने सांगितलं माझ्या नावाने मालमत्ता खरेदी करत असल्याचं सांगितलं. पण खरे तर त्याने ही मालमत्ता आमच्या दोघांच्या नावावर खरेदी केली होती. ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी माझ्या एकट्याचा पैसा वापरण्यात आला होता, असंही त्याने म्हटलं आहे. यारी रोड येथील एक फ्लॅट, एक सेमी कमर्शिअल प्रॉपर्टी, बुढाना येथील शाहपूरमध्ये फार्महाऊस आणि दुबईतील एका प्रॉपर्टीचा यात समावेश आहे.

21 कोटी रुपये हडपले

याबद्दल मी माझ्या भावाला जाब विचारला असता त्याने माझ्या आधीच्या बायकोला माझ्याविरोधात भडकवायला सुरुवात केली. माझ्याविरोधात खोटे आणि अत्यंत खालच्या पातळीवरचे आरोप करण्यासाठी पत्नीला भडकावल्या गेलं, असंही त्याने म्हटलं आहे. तसेच अंजनाने माझ्याशी विवाह केला. पण माझ्याशी विवाह करण्यापूर्वीच तिचा विवाह झालेला होता. तिने अविवाहित असल्याचं मला खोटं सांगितलं. पण जेव्हा मला सत्य कळलं तेव्हा मला धक्काच बसला, असं त्याने म्हटलं आहे. नवाजने त्याचा भाऊ आणि अंजनावर 21 कोटी रुपये हडपल्याचा आरोप केला आहे.

Non Stop LIVE Update
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.