Ranbir Kapoor | रणबीर कपूर याच्या चित्रपटाची बाॅक्स ऑफिसवर हवा, विकेंडला तब्बल इतक्या कोटींचे कलेक्शन
रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या तू झूठी मैं मक्कार या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट चांगली कामगिरी करताना दिसत आहे. पठाण चित्रपटानंतर बाॅलिवूडचे दोन चित्रपट फ्लाॅप गेले होते.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा त्याच्या तू झूठी मैं मक्कार या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट 8 मार्च रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केलाय. तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) दिसले. विशेष म्हणजे रणबीर आणि श्रद्धा कपूर यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडलीये. या जोडीने धमाका केला. शाहरूख खान (Shah Rukh Khan) याच्या पठाण चित्रपटानंतर कार्तिक आर्यन याचा शहजादा आणि अक्षय कुमार याचा सेल्फी हे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले.
तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाल करतो, याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी करण्यास सुरूवात केली. या चित्रपटाला रिलीज होऊन आता 5 दिवस झाले असून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल क्रेझ बघायला मिळत आहे. पुढील काही दिवसांपासून चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होाणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला विकेंडचा मोठा फायदा झाल्याचे दिसत आहे.
तू झूठी मैं मक्कार चित्रपटाने ओपनिंगच्या दिवशी 14 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. गुरुवारी चित्रपटाच्या कमाईमध्ये थोडी घट झाली आणि चित्रपटाने 10 कोटींचे कलेक्शन केले. शुक्रवारी 10.52 कोटी कलेक्शन केले. चित्रपटाला विकेंडचा फायदा झाल्याचे दिसत आहे. चित्रपटाने शनिवारी 16.57 कोटी आणि रविवारी 17.57 कोटींचे कलेक्शन केले असून एकूण 70.73 कोटींची कमाई आतापर्यंत चित्रपटाने केली.
रणबीर कपूर तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाचे जबरदस्त असे प्रमोशन करताना दिसला. विशेष म्हणजे चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रणबीर कपूर हा आपल्या खासगी आयुष्याबद्दल देखील बोलला. रणबीर कपूर याने सांगितले होते की, मला सध्या खूप जास्त आलिया आणि राहा यांची आठवण येत आहे. या दोघीही सध्या मुंबईमध्ये नाहीत.
आलिया तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग काश्मीर येथे करत असून तिने राहा हिला देखील सोबत नेले आहे. राहा हिच्याबद्दल देखील सांगताना रणबीर कपूर हा दिसला. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रणबीर कपूर याने थेट पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा जाहिर केली होती. मात्र, त्यानंतर विरोधात वाढल्याचे बघताच आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतल्याचे रणबीर कपूर हा म्हणाला होता.