आताही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर सलमान खान, धक्कादायक माहिती पुढे…
पंजाब पोलिसांनी पोलीस मुख्यालयावर हल्ला करण्यात आलेल्या आरोपींना नुकताच अटक केलीये. मात्र, या आरोपींकडून धक्कादायक खुलासा करण्यात आलाय.
मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात सलमान खानला (Salman Khan) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळतायंत. सलमान गुंडांच्या निशाण्यावर आहे. नुकताच एक बातमी पुढे येतंय, जी सर्वांना अस्वस्थ करणारी नक्कीच आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Bishnoi) गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी (Police) यावर तपासही सुरू केला होता. सलमानला जीवे मारण्याच्या धमकीनंतर त्याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली. इतकेच नाहीतर या घटनेनंतर सलमानने स्वसंरक्षणासाठी बंदूक परवान्यासाठी अर्ज देखील केला आणि त्याला परवाना देखील मिळाला.
पंजाब पोलिसांनी पोलीस मुख्यालयावर हल्ला करण्यात आलेल्या आरोपींना नुकताच अटक केलीये. मात्र, या आरोपींकडून धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार या आरोपींना सलमान खानचा जीव मारण्याचे काम देखील सोपवण्यात आले होते. अर्शदीप नावाच्या कुख्यात शूटरला अटक करण्यात आली असून यानेच ही माहिती दिलीये.
कुख्यात शूटर अर्शदीप आणि एक अल्पवयीन मुलाला पंजाब पोलिसांनी अटक केलीये. सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनेच सलमान खानला संपवण्याचे काम एका अल्पवयीन मुलाला दिले होते. मात्र, काही कारणामुळे लॉरेन्स बिश्नोईने हे काम त्यामुलाकडून काढून घेतले आणि त्याला राणा कंडोलवालियाला मारण्याची सुपारी दिली. म्हणजेच काय तर लॉरेन्स बिश्नोईनेचा निशाण्यावर अजूनही सलमान खान आहे.