Breakup Story | लग्नापर्यंत पोहचू शकले नाही शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉयचे प्रेम, ‘या’ कारणामुळे तुटले नाते!

शत्रुघ्न सिन्हा आणि रिया रॉय दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. पण, त्यांचे प्रेम लग्नाच्या नात्यात रूपांतरित होऊ शकले नाही. शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि रीना रॉयने पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केले.

Breakup Story | लग्नापर्यंत पोहचू शकले नाही शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉयचे प्रेम, ‘या’ कारणामुळे तुटले नाते!
शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 8:41 AM

मुंबई : प्रेम ही अशी भावना असते की, आपले नाते हळुवार फुलात आहे, हे आपल्याला माहित नसते. आपल्याला त्या व्यक्तीमधील प्रत्येक लहानसहन गोष्ट आवडण्यास सुरुवात होते, मग ते गोड स्मित असेल किंवा त्यांची बोलण्याची पद्धत असेल… जेव्हा आपण त्या व्यक्तीबरोबर असाल, तेव्हा आपल्याल नेहमी आनंदी वाटते, आपल्या चेहऱ्यावर हास्य येते. परंतु, ते प्रेम आपल्याला मिळेलच असे नाही. आज आम्ही तुम्हाला 70 आणि 80च्या दशकातील गाजलेली, अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आणि रीना रॉयच्या (Reena Roy ) प्रेमकथेविषयी सांगणार आहोत (Actor Shatrughan Sinha And Actress Reena Roy Breakup story).

शत्रुघ्न सिन्हा आणि रिया रॉय दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. पण, त्यांचे प्रेम लग्नाच्या नात्यात रूपांतरित होऊ शकले नाही. शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि रीना रॉयने पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केले. शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, पूनमबरोबर लग्न केले तेव्हा त्यांचे रीना रॉयवर प्रेम होते.

शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय ‘मिलाप’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यांचा हा चित्रपट हिट ठरला. त्यानंतर दोघांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि याच दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांच्या अफेअरची चर्चा देखील सुरु झाली होती. दोघेही बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

लग्नाची वाटायची भीती!

शत्रुघ्न सिन्हा यांनी स्टारडस्टला बॉलिवूड मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, त्यावेळी माझी सर्वात मोठी भावनिक भीती होती. मी खूप घाबरलो होतो. मला बॅचलर असल्याचा आनंद होता, पण मला त्यावेळी मला निर्णय गयाव लागणार होता. शेवटच्या क्षणापर्यंत मला लग्न करायचं नव्हतं. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की, लग्न मुंबईत होते आणि मी लंडनमध्ये होतो. लग्नाच्या वेळी मी तिथे पोचण्यासाठी शेवटची फ्लाईट पकडली. त्यावेळी पूनमला देखील वाटले की, मी लग्नापासून माघार घेत आहे. पूनम माझ्यासाठी परफेक्ट होती, जर लग्नात काही कमी राहिली असती, तर ती माझी चूक असती पूनमची नसती.

लग्नानंतरही रीनाशी जवळीक!

रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे नाते लग्नानंतरही संपले नाहीत. दोघे एकमेकांसोबत डेटवर जात असत आणि गुप्तपणे भेटत असत. पण पूनम याबद्दल कधीही बोलल्या नाहीत. पण एक वेळ असा आली जेव्हा रीना रॉय अभिनेत्याच्या आयुष्यातील ‘दुसऱ्या स्त्री’चा टॅग स्वीकारण्यात असमर्थ ठरली. एका वृत्तानुसार पहलज निहलानी या दोघांसाठी एक स्क्रिप्ट घेऊन आले होते. या दरम्यान, रीना रॉय म्हणाल्या होत्या की, शत्रुघ्न सिन्हा यांनी तिच्याशी लग्न केले, तरच ती या चित्रपटाला हो म्हणेल. निहलानी यांनीही शत्रुघ्न यांना हा संदेश दिला होता. मात्र त्यांनी यास नकार दिला आणि रीनाला केवळ नात्यातच राहायला सांगितले. पण रीना रॉयने त्यांचे म्हणणे फेटाळून लावले आणि हे संबंध संपवण्याचा निर्णय घेतला.

(Actor Shatrughan Sinha And Actress Reena Roy Breakup story)

हेही वाचा :

Video | ‘नो रिस्क, नो स्टोरी’, प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान नुसरत जहांचा स्विमिंग पूलमधील बोल्ड व्हिडीओ चर्चेत!

Indian Idol 12 | जितकं गॉसिप होईल, तितकाच टीआरपी वाढेल! कुमार सानूने उडवली ‘इंडियन आयडॉल 12’ची खिल्ली

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.