Sonu Sood | अभिनेता ‘सोनू सूद’ राजकीय आखाड्यात उतरुन शड्डू ठोकणार!

लॉकडाऊनच्या वाईट काळात अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) लोकांच्या मदतीला धावून गेला.

Sonu Sood | अभिनेता 'सोनू सूद' राजकीय आखाड्यात उतरुन शड्डू ठोकणार!
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 9:19 AM

मुंबई : लॉकडाऊनच्या वाईट काळात अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) लोकांच्या मदतीला धावून गेला. ज्यांनी त्याच्याकडे मदत मागितली अशा प्रत्येक व्यक्तीला त्याने मदत देखील केली आहे. कोणी त्याला उपचारासाठी मदत मागितली असो वा, लॉकडाऊनच्या काळात गावी गाण्यासाठी बस अशा विविध प्रकारच्या मदत करून त्याने लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदत करत होता त्यावेळी अनेक राजकारणी लोक देखील त्याला भेटत होते आणि अनेक राजकीय पक्षांकडून त्याला ऑफर आल्या होत्या. यामुळे एक चर्चा अशी होती की, तो राजकारणात प्रवेश करणार आहे. मात्र, यासर्वांवर आता सोनू सूदने स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. (Actor Sonu Sood to enter politics)

बॉलिवूड हंगामाच्या एका वृत्तानुसार सोनू सूद म्हणाला की, एक अभिनेता म्हणून मला अजून खूप पुढे जायचे आहे. मी जी स्वप्ने पाहिली ती अजूनही पूर्ण झालेली नाहीत आणि मला असे वाटते की, मी प्रथम ते पूर्ण करणे आवश्यक आहे. राजकारणात येण्यासाठी कुठलाही विशिष्ट वेळ ठरलेला नसतो आणि राजकारणामध्ये येण्याचा विचार मी 5 किंवा 10 वर्षांनंतर करेल.

पुढे सोनू सूद म्हणाला की, मला वाटते की ज्या गोष्टींमध्ये मी एक्सपर्ट आहे त्या गोष्टी मी अगोदर केल्या पाहिजेत आणि मी त्याला न्याय देऊ शकतो. मी जर सध्याच राजकारणात प्रवेश केला तर गावोगावी जाऊन लोकांना मदत करू शकणार नाही. म्हणून मी आताच राजकारणात प्रवेश करणार नाही कारण मी त्या पदाला सध्या न्याय देऊ शकत नाही. आता एक अभिनेता म्हणून खूप काही करायचे राहिले आहे आणि आता मी ते करण्याचा प्रयत्न करत आहे.

तेलंगणातील सिद्दीपेट जिल्हातील डब्बा टांडागावातील लोकांनी सोनू सूदला समर्पित मंदिर बांधले आहे. या मंदिराचे ग्रामस्थांनी उद्घाटन केले. यावेळी सोनू सूदची आरती करण्यात आली. महिलांनी पारंपरिक वेषभूषा करून गाणे देखील होते. जिल्हा परिषद सदस्य गिरी कोंडल रेड्डी म्हणाले होते की, कोरोनो व्हायरसच्या काळात सोनू सूदने जनतेसाठी मोठे काम केले आहे.

संबंधित बातम्या :

दोन दुकाने, सहा फ्लॅट गहाण ठेवून गरिबांना मदत; गरजवंतांच्या मदतीसाठी सोनू सूदने घेतलं 10 कोटींचं कर्ज

Sonu Sood | पंजाबचा ‘स्टेट आयकॉन’, अभिनेता सोनू सूदच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

(Actor Sonu Sood to enter politics)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.