‘स्वदेस’ फेम अभिनेत्रीच्या कारची जोरदार धडक, स्विस दाम्पत्याचा मृत्यू; कुठे घडला भयानक अपघात?

स्वदेस सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात एक स्विस दाम्पत्य दगावले आहे. यावेळी गायत्रीसोबत तिचा पती विकासही होता. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

'स्वदेस' फेम अभिनेत्रीच्या कारची जोरदार धडक, स्विस दाम्पत्याचा मृत्यू; कुठे घडला भयानक अपघात?
Swades actress gayatri joshis accident in italyImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 7:53 AM

सार्डिनिया | 4 ऑक्टोबर 2023 : अभिनेता शाहरुख खानच्या स्वदेस या सिनेमातून पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशी हिच्या कारचा भयंकर (Swades actress gayatri joshis accident in italy) अपघात झाला आहे. इटली येथे हा अपघात झाला आहे. या कारमधून गायत्री आणि तिचा पती विकास ओबेरॉय प्रवास करत होते. दोघेही अपघातून बालंबाल बचावले असून या अपघातात दोन स्विस दाम्पत्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

इटलीच्या सार्डिनिया परिसरात हा अपघात झाला. अभिनेत्री गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय दोघेही लेम्बॉर्गिनी कारने जात होते. त्यांच्या मागे पुढे अनेक लग्झरी गाड्या चालल्या होत्या. त्यावेळी एका मिनी ट्रकला ओव्हरटेक करताना त्यांच्या कारने फेरारी कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे ही कार मिनी ट्रकला जाऊन धडकली. त्यामुळे मिनी ट्रक पलटी झाला आणि फेरारीला आग लागली. या दुर्घटनेत एका स्विस दाम्पत्याचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

कारण काय?

अभिनेत्री गायत्री जोशी आणि तिचा पती विकास हे दोघेही लग्झरी गाड्यांसोबत रेस करत होते. त्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस या घटनेचाही तपास करत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.

स्वित्झर्लंडचे दाम्पत्य

या अपघातात दगावलेल्या दोन्ही दाम्पत्यांची ओळख पटली आहे. दोघेही स्वित्झर्लंडचे रहिवाशी आहेत. मेलिसा क्रोटली वय 63 आणि मार्कस क्रौटली वय 67 असं या दाम्पत्यांचं नाव आहे. एका न्यूज वेबसाईटला गायत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. विकास आणि मी इटलीत आहे. आम्ही एका दुर्घटनेचे शिकार झालो आहोत. देवाच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप आहोत, असं तिने म्हटलं आहे.

अपघात कॅमेऱ्यात कैद

दरम्यान, या दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पाठीमागून येणाऱ्या एका कारच्या डॅशबोर्डला लावलेल्या कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे. या व्हिडीओतून अपघात स्पष्टपणे दिसत आहे. अनेक लग्झरी कार कॅमेरा लावलेल्या कारला ओव्हरटेक करताना दिसत आहे. थोड्या अंतरावर गेल्यावर मिनी ट्रकला ओव्हरटेक करताना टक्कर मारताना दिसत आहे. त्यामुळे ट्रक पलटी होतानाही दिसत आहे.

एका सिनेमानंतर बॉलिवूडपासून दूर

गायत्री जोशीने स्वदेस सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात ती शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत होती. तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. मात्र, स्वदेसनंतर ती कोणत्याच सिनेमात दिसली नाही. तिने अभिनयापासून फारकत घेतली होती. त्यानंतर तिने ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न गेलं होतं.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.