कंगना रनौतच्या वैयक्तिक अंगरक्षकाला बेड्या, लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याचा आरोप

अभिनेत्री कंगना रनौतचा वैयक्तिक अंगरक्षक कुमार हेगडेला पोलिसांनी अटक केली आहे (Actress Kangana Ranaut bodyguard Kumar Hegde arrested)

कंगना रनौतच्या वैयक्तिक अंगरक्षकाला बेड्या, लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याचा आरोप
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 6:36 PM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतचा वैयक्तिक अंगरक्षक कुमार हेगडेला मुंबई पोलिसांनी कर्नाटकात जावून अटक केली आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. हेगडेला बलात्कार आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी त्याला त्याच्या गावात जावून अटक केली आहे. पोलीस जेव्हा कुमार हेगडेच्या गावात गेले तेव्हा तो त्याच्या लग्नाची पत्रिका वाटत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली. मुंबईचे डीएन नगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. त्याला सध्या कर्नाटकातून महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरु आहे (Actress Kangana Ranaut bodyguard Kumar Hegde arrested).

कुमार हेगडे विरोधात तक्रार करणारी महिला ही एक ब्युटीशियन आहे. कुमार हेगडे बऱ्याच दिवसांपासून संपर्कात न आल्याने तिने अखेर पोलिसांकडे जावून आपली व्यथा मांडली. विशेष म्हणजे हेगडेने आई आजारी असल्याचा बहाणा करुन 50 हजार रुपये घेतले. पण ते परत केले नाहीत, असाही आरोप पीडितेने केला आहे. तसेच त्याने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला, असाही आरोप महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.

तक्रारदार महिलेने आणखी काय म्हटलं आहे?

पीडित महिलेने आपल्या तक्रारीत कुमार हेगडेला कधीपासून भेटले पासून ते शेवटची भेट कधी झाली याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पीडिता हेगडेला आठ वर्षांपासून ओळखते. त्यांची आठ वर्षांपूर्वी ओळख झाली होती. गेल्यावर्षी जून महिन्यात कुमार हेगडेने तिला लग्नासाठी विचारलं होतं. पीडितेने तेव्हा भावनेच्या भरात होकार दिला होता. त्यानंतर आई आजारी असल्याचं सांगून कुमार कर्नाटकला निघून गेला. तसेच त्याने पीडितेकडून आईच्या उपचारासाठी पैसे हवेत असं सांगून 50 हजार रुपये घेतले. पण त्यानंतर तो एकदाही संपर्कात आला नाही, असा आरोप पीडितेने केला आहे.

हेही वाचा : SRPF जवानाच्या नावे फेसबुक अकाऊंट, चुलत भावाकडे पैशाची मागणी, एका फोनमुळे आरोपीचा प्लॅन फसला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.