जे करायला नको, तेच करायला लावलं, प्रसिद्ध अभिनेत्रीचा अभिनेत्यावर गंभीर आरोप; काय आहे प्रकरण?

एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या सहकारी कलाकारावर मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. या सहकलाकाराविरोधात तिने एफआयआरही दाखल केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. इंडस्ट्रीत चर्चांना उधाण आलं आहे.

जे करायला नको, तेच करायला लावलं, प्रसिद्ध अभिनेत्रीचा अभिनेत्यावर गंभीर आरोप; काय आहे प्रकरण?
Bhojpuri actressesImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 6:58 AM

नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : अनेक अल्बममध्ये एकत्र काम करणाऱ्या एक प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या सहकलाकरावर गंभीर आरोप केला आहे. आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. लग्नाचं अमिष दाखवून आपल्यावर हे अत्याचार केल्याचं सांगत या अभिनेत्रीने तिच्या सहकलाकाराविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे. दरम्यान, तिच्या सहकलाकाराने या प्रकरणावर अजूनही काही भाष्य केलेलं नाहीये.

प्रसिद्ध आणि लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री प्रियांशू सिंह हिने हा गंभीर आरोप केला आहे. तिचा सहकलाकार पुनीत सिंह राजपूत याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्याच्याविरोधात प्रियांशूने एफआयआर दाखल केला आहे. पुनीत माझ्याशी अननॅच्यूअरल फिजिकल गोष्टी करत होता. जे करायला नको ते माझ्याकडून करवून घेत होता, असा गंभीर आरोप प्रियांशूने केला आहे. प्रियांशूने एका मुलाखतीत हा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे प्रियांशू आणि पुनीत या दोघांनीही अनेक भोजपुरी गाण्यात एकत्र काम केलं आहे.

आधी विनम्र नंतर…

सोशल मीडियाच्या माध्यमातून पुनीतची ओळख झाली होती. सुरुवातीला तो अत्यंत विनम्र होता. फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी त्याने माझा वापर केला. तसेच माझ्याशी लग्न करण्याचं तो वारंवार आश्वासन देत होता. त्याबदल्यात तो माझ्याकडून नको त्या गोष्टी करून घेत होता. मला या गोष्टी करायच्या नव्हत्या. पण त्याने जबरदस्तीने या गोष्टी करून घेतल्या, असा गंभीर आरोप प्रियांशूने केला आहे.

हे सुद्धा वाचा

विश्वास जिंकला, जबरदस्ती केली

पुनीतने सुरुवातीला माझा विश्वास जिंकला होता. त्यानंतर तो माझ्या घरी येऊजाऊ लागला. माझ्या जवळपासच तो राहायला आला होता. एकदा मी एकटीच घरी असताना तो घरी आला होता. तो नशेत होता. नशेच्या धुंदीतच त्याने माझ्याशी जबरदस्ती केली. त्यानंतर रात्री जो प्रकार घडला त्यावरून त्याने मला धमकी दिली. मी पोलीस ठाण्यात जाऊ नये म्हणून तो रडायला लागला. माझी माफी मागू लागला. माझ्या कुटुंबीयांचं मन वळवतो आणि तुझ्याशी लग्न करतो, असं आश्वासनही त्याने मला दिलं होतं, असं प्रियांशूचं म्हणणं आहे.

लग्नच करायचं नाही, न्याय द्या

आपलं रिलेशनशीप किती टॉक्सिक आहे हे कोणतीही मुलगी सांगत नाही. तिला वाटतं सर्व काही बाहेर यावं. तिला न्याय मिळावा. पुनीतला शिक्षा झाली पाहिजे, असं सांगतानाच आता मला पुनीतशी लग्नच करायचं नाहीये, असंही तिने स्पष्ट केलं.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.