Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार?…नॅशनल क्रश असलेली रश्मिका ‘या’ घराण्याची सून होणार!

लाखो दिलो की, धडक असणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) नेहमीच चर्चेत असते. रश्मिकाचे फोटो आणि व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर खूप पसंत केले जातात. दक्षिणात्य मनोरंजन विश्वात रश्मिका आधीपासूनच सुपरहिट होती, परंतु आता संपूर्ण जगभरात तिचे चाहते तयार झाले आहेत.

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार?...नॅशनल क्रश असलेली रश्मिका 'या' घराण्याची सून होणार!
अभिनेत्री श्मिका मंदान्ना लवकरच लग्न बंधणात अडकण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 1:39 PM

मुंबई : लाखो दिलो की, धडक असणारी अभिनेत्री मंदाना रश्मिका  (Rashmika Mandanna) नेहमीच चर्चेत असते. रश्मिकाचे फोटो आणि व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर खूप पसंत केले जातात. दक्षिणात्य मनोरंजन विश्वात रश्मिका आधीपासूनच सुपरहिट होती, परंतु आता संपूर्ण जगभरात तिचे चाहते तयार झाले आहेत. आतापर्यंत रश्मिकाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामध्येही नुकताच रिलीज झालेला रश्मिकाचा पुष्पा चित्रपट (Pushpa Movie) तर सुपरहिट ठरला आहे. आता रश्मिकाबद्दलची एक अत्यंत मोठी बातमी पुढे येते आहे.

रश्मिका आणि विजय यांची ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोघे मुंबईत डेटवर जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे आता त्यांच्या लग्नाबद्दल देखील अनेक गोष्टी पुढे येत आहेत. हे दोघेही लवकरच लग्नबंधण्यात अडकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावर्षीच हे लग्न करणार आहेत. मात्र, अजूनही रश्मिका आणि विजय यांनी आपल्या रिलेशनसंदर्भात कोणतेही भाष्य केले नाही. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी गीता गोविंदम आणि डियर कॉम्रेड या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

इथे पाहा खास पोस्ट

लग्नाची गोड बातमी ऐकण्यासाठी चाहते आतुर

चाहत्यांना देखील विजय आणि रश्मिका यांची केमिस्ट्री बघायला प्रचंड आवडते. असे म्हटले जात आहे की रश्मिका आणि विजय रिलेशनशिपमध्ये आहेत आणि या वर्षाच्या अखेरीस ते लग्न करू शकतात. विजय देवरकोंडा पुरी जगन्नाधच्या लिगरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रश्मिकाने नुकतेच मुंबईत एक अपार्टमेंट विकत घेतले आहे आणि तिथेच ती राहते आहे. रश्मिका आणि विजय मुंबईत अनेकदा डेटवर जाताना दिसले. चाहते आता आतुरतेने वाट पाहात आहेत की, विजय आणि रश्मिका त्यांच्या लग्नाची गोड बातमी कधी देणार.

संबंधित बातम्या : 

Omprakash : भैय्या म्हटल्यावर तक्रार करणाऱ्या आणि तब्बल 350 भूमिका साकारणाऱ्या ओमप्रकाश यांची रंजक कहाणी

VIDEO | चाहत्याची मिठी सुपरस्टार Pawan Kalyan यांच्या अंगलट, धावत्या कारखाली येताना थोडक्यात वाचले

घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.