प्रत्येक डॉक्टर देव नसतो… वडिलांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार; अभिनेत्री संभावना सेठ लालबूंद

वडिलांच्या निधनानंतर भोजपुरी सिनेमातील अभिनेत्री संभावना सेठ प्रचंड लालबूंद झाली आहे. (Actress Sambhavna Seth alleged hospital killed her father)

प्रत्येक डॉक्टर देव नसतो... वडिलांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार; अभिनेत्री संभावना सेठ लालबूंद
Sambhavna Seth
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 6:08 PM

जयपूर: वडिलांच्या निधनानंतर भोजपुरी सिनेमातील अभिनेत्री संभावना सेठ प्रचंड लालबूंद झाली आहे. तिने वडिलांच्या निधनाला रुग्णालयालाच दोषी ठरवलं असून या रुग्णालयाला नोटीस पाठवण्याची तयारीही सुरू केली आहे. तसेच प्रत्येक डॉक्टर हा देव नसतो, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही संभावनाने व्यक्त केली आहे. (Actress Sambhavna Seth alleged hospital killed her father)

संभावना सेठीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. माझ्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर योग्य उपचार झाले नाही. रुग्णालयातील कर्मचारीही त्यांच्याशी उद्धटपणे वागले, असं सांगतानाच आता जयपूर गोल्डन रुग्णालयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं तिनं म्हटलं आहे. 8 मे रोजी संभावनाचे पती अविनाश यांनी तिच्या वडिलांचं निधन झाल्याची माहिती दिली होती. त्यांनी इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली होती.

माझ्या वडिलांची हत्या केली…

संभावनाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून पोस्ट लिहिली आहे. त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आहे. जग केवळ ब्लॅक किंवा व्हाईट नसतं. त्याचप्रमाणे डॉक्टरही देवासारखे असू शकत नाहीत. आपल्या प्रियजनांना मारणारे पांढऱ्या कपड्यातही काही वाईट लोक आहेत, असं तिने म्हटलं आहे.

या व्हिडीओत तिने तिच्या वडिलांचा मृत्यू हा मेडिकल मर्डर असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याच्या दोन तासानंतरच माझ्या वडिलाचं निधन झालं. उपचाराच्या नावाने त्यांची हत्याच केली असंही म्हणता येईल. वडिलांना मी कायमची गमावून बसेल अशी मला कायम भीती वाटत आली आहे. या काळात मी त्याचा सामनाही केला. आता मी निर्भिड होऊन सत्यासाठी लढणार आहे. माझ्या वडिलांनीच मला निर्भिड होऊन लढायला शिकवलंय. या लढाईत या लोकांना मी पराभूत करेल की नाही माहीत नाही, पण त्यांचं असली रुप जगासमोर निश्चितच आणेन, असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे.

सर्व मिळून लढूया

वडिलांच्या निधनानंतर सर्व विधी पूर्ण होण्याची मी वाट पाहत होते. आता मला या लढाईत तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तुमच्यापैकी प्रत्येकजण या कठिण काळात रुग्णालयात जाऊन आला आहे, हे मी जाणून आहे. तुम्हालाही अशाच प्रकारच्या वैद्यकीय सेवेच्या निष्काळजीपणाचा सामना करावा लागला आहे. परंतु सर्वच जण विविध कारणामुळे या व्यवस्थेच्या विरोधात लढू शकतन नाहीत. परंतु आता आपण सर्व मिळून ही लढाई लढू या, असं आवाहनही तिने केलं आहे. (Actress Sambhavna Seth alleged hospital killed her father)

संबंधित बातम्या:

Good News | श्रेया घोषालच्या घरी चिमुकल्याचे आगमन, गोड बातमी देताना झाली भावूक

‘जनहित में जारी’! नुसरत भरुचा विकणार कंडोम; वाचा काय आहे प्रकरण

PHOTO | रायमा सेनने ‘टॉपलेस’ फोटोशूट शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा, बोल्डनेस पाहून चाहतेही झाले घायाळ!

(Actress Sambhavna Seth alleged hospital killed her father)

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.