दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून जॅकलिन फर्नांडिसची चौकशी सुरू, वाचा नेमके प्रकरण काय?
दिल्ली पोलिसांनी या अगोदर जॅकलिन फर्नांडिसला दोन समन्स पाठवले होते, मात्र, दरवेळी कामाचे कारण देत जॅकलिनने चाैकशीला येणे टाळले. परंतू दिल्ली पोलिसांच्या तिसऱ्या समन्सनंतर जॅकलिन आज चाैकशीसाठी कार्यालयात पोहचलीय.
मुंबई : जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) एका गंभीर प्रकरणात अडकलीय. याप्रकरणी जॅकलिनचे पाय खोलात असल्याचे सांगितले जातंय. यामुळे आता जॅकलिनच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीय. 14 सप्टेंबर म्हणजेच आज जॅकलिन फर्नांडिस दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहचली आहे आणि तिथे तिची कसून चाैकशी केली जाणार आहे. दिल्ली पोलीस 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी (Extortion) जॅकलिनकडून उत्तरे घेणार आहेत. इतकेच नाही तर सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिनचे नेमके काय संबंध आहेत, यावरही विचारणा होऊ शकते.
इथे पाहा चाैकशीला जात असतानाचा जॅकलिन फर्नांडिसचा व्हिडीओ
Jacqueline Fernandez arrives at EOW office in Delhi in connection with the conman Sukesh Chandrashekhar money Laundering case https://t.co/XFDrF8xDaB pic.twitter.com/qzkIfe9Tzh
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) September 14, 2022
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर अत्यंत मोठा आरोप…
दिल्ली पोलिसांनी या अगोदर जॅकलिन फर्नांडिसला दोन समन्स पाठवले होते, मात्र, दरवेळी कामाचे कारण देत जॅकलिनने चाैकशीला येणे टाळले. परंतू दिल्ली पोलिसांच्या तिसऱ्या समन्सनंतर जॅकलिन आज चाैकशीसाठी कार्यालयात पोहचलीय. जॅकलिन फर्नांडिसवर मोठा आरोप असून गुन्हेगारी कमाईतून मिळालेल्या भेटवस्तूंचा वापर जॅकलिनने केला आहे, हा आरोप तिच्यावर करण्यात आलांय.
पिंकी इराणी आणि जॅकलिनची चाैकशी समोरासमोर होण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेने पिंकी इराणीलाही चौकशीसाठी समन्स बजावला आहे. इराणीनेच सुकेशला जॅकलिन फर्नांडिसशी संपर्क साधण्यास मदत केली असल्याचा आरोप आहे. पिंकी इराणी सुकेश आणि जॅकलिन या दोघांनाही ओळख असून तिनेच मधल्या दुव्याचे काम केल्याचे सांगण्यात येतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकी आणि जॅकलीन यांची आज समोरासमोर चाैकशी होण्याची दाट शक्यता आहे.