रामायणाचं इस्लामिकरण, ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाला नोटीस; डेडलाईन कशासाठी?

धार्मिक भावनेशी खेळू नका, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. लोकांच्या भावनेला शिव्या देऊ नका. रामायण आणि रामचरितमानस जसं आहे, तशाच प्रकारे सिनेमा दाखवावा.

रामायणाचं इस्लामिकरण, 'आदिपुरुष'च्या दिग्दर्शकाला नोटीस; डेडलाईन कशासाठी?
रामायणाचं इस्लामिकरण, 'आदिपुरुष'च्या दिग्दर्शकाला नोटीस; डेडलाईन कशासाठी?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 1:14 PM

नवी दिल्ली: अभिनेता प्रभासचा (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा वादात अडकला आहे. या सिनेमातील सैफ अली खानच्या लूकमुळे सर्वाधिक वाद निर्माण झाला आहे. सैफच्या लूकवर आक्षेप घेण्यात आळा आहे. सर्व ब्राह्मण सभेने या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत (om raut) यांना गुरुवारी एक नोटीस पाठवली आहे. या लीगल नोटिशीनुसार राऊत यांना येत्या सात दिवसात सिनेमातील सर्व वादग्रस्त दृश्य हटवण्याची आणि जाहीर माफी मागण्याची मुदत देण्यात आली आहे. तसे न केल्यास राऊत यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सर्व ब्राह्मण सभेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांनी त्यांचे वकील कमलेश शर्मा यांच्या मार्फत ओम राऊत यांना नोटीस पाठवली आहे. आदिपुरुष सिनेमात हिंदू देवी- देवतांना चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं आहे. या सिनेमातील देवी देवतांच्या चामड्याचे कपडे चुकीच्या पद्धतीने बोलताना दाखवले गेले आहेत.

या सिनेमातील भाषा खालच्या स्तराची आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. काही संवादातून तर जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे आहेत. रामायण आमचा इतिहास आहे आणि आदिपुरुषमध्ये हनुमानाला मोगलांसारखं दाखवलं गेलं आहे, असं या नोटिशीत म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

मिशीशिवाय कोणता हिंदू दाढी ठेवतो. या सिनेमात हनुमानाला दाढी दाखवली आहे. पण मिशी नाही. या सिनेमातून भगवान राम, सीता, हनुमान यांच्यासह संपूर्ण रामायणाचच इस्लामिकरण करण्यात आलं आहे. या सिनेमात रावणाची भूमिका साकार करणारा सैफ अली खानही तैमूर किंवा खिलजी वाटतो.

या सिनेमातून देशातील लोकांच्या धार्मिक भावनेला धक्का पोहोचवण्याचं काम करण्यात आलं आहे. जे फोटो सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. त्यातून आमच्या समाज आणि देशाचं नुकसान होत आहे, असंही या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे.

धार्मिक भावनेशी खेळू नका, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. लोकांच्या भावनेला शिव्या देऊ नका. रामायण आणि रामचरितमानस जसं आहे, तशाच प्रकारे सिनेमा दाखवावा. त्यामुळेच सात दिवसात माफी मागण्यासाठी आणि वादग्रस्त दृश्य हटवण्यासाठी तुम्हाला ही नोटीस पाठवली जात आहे. नाही तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असा इशाराही या नोटिशीत देण्यात आला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.