Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samantha-Naga Chaitanya Divorce | अफेयर, करिअर की आणखी काही? समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं नेमकं कारण काय?

गेल्या अनेक दिवसांपासून समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) आणि नाग चैतन्यच्या (Naga Chaitanya) घटस्फोटाची चर्चा सुरु होती. अखेर आज दोघांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे.

Samantha-Naga Chaitanya Divorce | अफेयर, करिअर की आणखी काही? समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं नेमकं कारण काय?
Naga Chaitanya-Samantha
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 4:50 PM

मुंबई : ‘आमच्या सर्व हितचिंतकांनो, खूप विचारविनिमयानंतर, सॅम आणि मी पती-पत्नी म्हणून आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की, आमची मैत्री दहा वर्षांपेक्षा जास्त आहे जी आमच्या नात्याचा आधार होती. जी आमच्यामध्ये नेहमीच एक विशेष नाते ठेवेल. आम्ही आमच्या चाहत्यांना, माध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार’, अशी पोस्ट लिहित अखेर आज (2 ऑक्टोबर) समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) आणि नाग चैतन्यच्या (Naga Chaitanya) घटस्फोटाची चर्चा सुरु होती. अखेर आज दोघांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. काही काळापूर्वी दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीने (Samantha Akkineni ) सोशल मीडियावरून ‘अक्किनेनी’ हे आडनाव काढून टाकले होते. नागा चैतन्यशी लग्नानंतर अभिनेत्रीने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे आडनाव जोडले होते. मात्र आता समंथा आणि तिचा पती नागा चैतन्य यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामुळेच तिने आपल्या नावापुढील आडनाव काढून टाकले आहे, असे म्हटले जात होते. अखेर आता आपण वेगळं होत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

घटस्फोटाचं नेमकं कारण काय?

प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्कीनेनी आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य यांनी 2017मध्ये लग्न केले. दोघेही दक्षिण भारतीय मनोरंजन विश्वाची क्यूट जोडी मानली जायचे. परंतु, त्यांचे वैवाहिक आयुष्य चांगले जात नसल्याच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. असेही म्हटले जाते की, नागा चैतन्य कुटुंब नियोजनाचा विचार करत होता आणि त्यासाठी त्याने समंथा हिने काही काळ चित्रपट करणे थांबवावे आणि कुटुंबाला पुढे न्यावे अशी इच्छा होती.

सासऱ्यांना आवडत नव्हते बोल्ड सीन!

समंथा आणि नागा चैतन्यच्या वैवाहिक जीवनात दुरावा येण्याचे कारण अभिनेत्रीचे तिच्या करिअरवरील प्रेम आहे. लग्नानंतरही सामंथा चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स चित्रीत करत आहे, जे तिचे सासरे नागार्जुन यांना आवडत नाहीत, असे देखील म्हटले जाते. दुसरीकडे, सामंथा तिच्या कारकिर्दीत उत्तम कामगिरी करत आहे आणि या क्षणी ती काम सोडायला तयार नाही आणि आता ज्या प्रकारे तिने नवीन चित्रपट साईन केला आहे, असे दिसते की तिला खरोखरच तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. याच कारणामुळे दोघांचे लग्न तुटले आहे.

हेही वाचा :

Samantha-Naga Chaitanya Divorce | ‘आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे…’, समंथा-नागा चैतन्यने केली घटस्फोटाची घोषणा!

‘त्यांची भेट व्हावी ही कधीपासूनची इच्छा’, ‘अण्णा नाईकां’नी घेतली खासदार उदयनराजे भोसलेंची भेट!

Boycott Bigg Boss 15 | सुरु होण्यापूर्वीच सलमान खानच्या ‘बिग बॉस 15’वर बंदी घालण्याची मागणी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय…

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.