अफगाणिस्तानवर तालिबानी कब्जानंतर सोशल मीडियावर व्यक्त झाली कंगना, म्हणाली ‘मोदीजी नसतील तर…’

तालिबानने अफगाणिस्तानचा पूर्णपणे ताबा घेतला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेले आहेत. एक निवेदन जारी करताना ते म्हणाले की, देशाला रक्तपात करण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी देश सोडला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा ताबा असल्याने परिस्थिती गंभीर आहे.

अफगाणिस्तानवर तालिबानी कब्जानंतर सोशल मीडियावर व्यक्त झाली कंगना, म्हणाली ‘मोदीजी नसतील तर...’
Kangana Ranaut
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 12:08 PM

मुंबई : तालिबानने अफगाणिस्तानचा पूर्णपणे ताबा घेतला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेले आहेत. एक निवेदन जारी करताना ते म्हणाले की, देशाला रक्तपात करण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी देश सोडला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा ताबा असल्याने परिस्थिती गंभीर आहे. कोणतीही वस्तू सोबत न घेता लोक देश सोडून पळून जात आहेत. काबूल विमानतळावरील व्हायरल व्हिडीओंमध्ये लोकांमधील भीती स्पष्टपणे दिसत आहे. लोकांना कोणत्याही प्रकारे तो देश सोडून जायचे आहे.

कंगना रनौतने दिली प्रतिक्रिया

देशातून बाहेर पडण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओंमध्ये काही लोक धावपट्टीवर धावत्या विमानाच्या बाहेरील बाजूस लटकलेले दिसत आहेत. ही परिस्थिती पाहता भारतातील लोकही यावर प्रतिक्रिया देत आहेत. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि बोल्ड स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगना राणौतनेही (Kangana Ranaut) या प्रकरणावर आपले विचार मांडले आहेत.

सुरुवात घर्पासून करायला हवी…

एका ब्रेकिंग न्यूजचा फोटो पोस्ट करत कंगनाने लिहिले, ‘आज आपण हे शांतपणे पाहत आहोत, उद्या आपल्यासोबतही असे होऊ शकते’. यासह, कंगनाने आणखी एका बातमीवर आपले विचार शेअर केले आहेत, ज्यात असे म्हटले जात आहे की, भारत सरकार अफगाणिस्तानातील सर्व हिंदूंना भारतात आणेल. यावर उत्तर देताना कंगनाने लिहिले, ‘शाबास मी सीएएसाठी लढलो, मला संपूर्ण जग वाचवायचे आहे, पण मला त्याची सुरुवात माझ्या घरातून करावी लागेल’.

CAA बद्दल आभार…

यासोबतच दुसरी स्टोरी पोस्ट करताना कंगनाने लिहिले, ‘अफगाणिस्तानला आपली गरज आहे हे खरे आहे. ते सर्व नाटकी लोक जे पॅलेस्टाईन मुसलमानांसाठी अश्रू ढाळत होते, ते आता अफगाण मुस्लिमांच्या मृत्यूचा उत्सव साजरा करत आहेत. मी माझ्या सरकारचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी CAA आणले आणि आशा व्यक्त केली की सर्व हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी आणि शेजारच्या इस्लामिक देशांतील इतर धार्मिक समुदायांना भारतात राहण्यासाठी जागा मिळेल. आज आपण संपूर्ण अफगाणिस्तान वाचवू शकतो, पण आपण आपल्या घरापासून सुरुवात करू. मी अफगाणिस्तानसाठी प्रार्थना करते.’

मोदीजी नसतील तर…

यासोबतच कंगनाने आणखी अनेक फोटो पोस्ट करून अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. कंगनाने लिहिले, ‘इस्लामी राष्ट्र बनण्यापूर्वी अफगाणिस्तान हे हिंदू आणि बौद्ध राष्ट्र होते, हे तुम्हाला माहीत आहे का? यासह, ती म्हणाली की लक्षात ठेवा पाकिस्तान अमेरिकेला सांभाळतो आणि अमेरिका त्यांना शस्त्रे देते. तालिबान आपल्या किती जवळ आला आहे?  मोदीजी नसतील तर आपलंही उद्या असचं होऊ शकतं.

यासोबतच कंगनाने अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करणारे अनेक व्हिडीओही शेअर केले. कंगनाशिवाय इतर अनेक स्टार्सनी ही पोस्ट शेअर केली आहे. रिया चक्रवर्ती आणि इतर स्टार्सनी अफगाणिस्तानच्या लोकांच्या आणि महिलांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

 ‘दयाबेन’ का सतत म्हणायची ‘टप्पू के पापा’? उत्तर देताना दिशा वाकाणी म्हणाली…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.