Dostana 2 | कार्तिकच्या एक्झिटनंतर ‘दोस्ताना 2’मध्ये अक्षय कुमारची एंट्री, लवकरच शुटींग सुरु करणार?

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aarayan) याला नुकताच 'दोस्ताना 2'  (Dostana 2) या चित्रपटामधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आता कार्तिक चित्रपटातून बाहेर पडल्यामुळे निर्माते चित्रपटासाठी नवीन चेहरा शोधत आहेत.

Dostana 2 | कार्तिकच्या एक्झिटनंतर ‘दोस्ताना 2’मध्ये अक्षय कुमारची एंट्री, लवकरच शुटींग सुरु करणार?
अक्षय कुमार-कार्तिक आर्यन
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 2:59 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aarayan) याला नुकताच ‘दोस्ताना 2’  (Dostana 2) या चित्रपटामधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आता कार्तिक चित्रपटातून बाहेर पडल्यामुळे निर्माते चित्रपटासाठी नवीन चेहरा शोधत आहेत. अशा परिस्थितीत करण जोहर आता या चित्रपटात कार्तिकच्या जागी अक्षय कुमार (Akshay Kumar) याला घेणार असल्याची बातमी समोर येत आहे (Akshay Kumar Replaced Kartik Aaryan in Karan Johar upcoming film Dostana 2).

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, अभिनेत्यानेने चित्रपटास होकार दिला आहे आणि त्याचे शूटिंग 2022 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, अक्षय कुमारने खरंच हा चित्रपट साईन केला आहे की, नाही याची अधिकृत घोषणा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी केलेली नाही.

अक्षय ‘दोस्ताना 2’मध्ये दिसणार का?

अक्षय कुमार आणि करण जोहरचे संबंध खूप चांगले आहेत. यापूर्वी अक्षयने ‘धर्मा’ प्रोडक्शनच्या ‘केसरी’ आणि ‘गुड न्यूज’मध्ये काम केले आहे. दोन्ही चित्रपट पडद्यावर सुपरहिट झाले होते, त्यामुळे स्पॉटबॉयच्या म्हणण्यानुसार अक्षयने या प्रोजेक्टला देखील हो म्हटलं आहे आणि पुढच्या वर्षी या चित्रपटाची शूटिंगही सुरु होऊ शकते. सध्या अक्षय कुमार आपल्या उर्वरित प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे, म्हणूनच तो 2022 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू शकतो.

यापूर्वी अशी बातमी आली होती की, कार्तिक बाहेर पडल्यानंतर करणने अक्षयला ही फिल्म करण्यासाठी विनंती केली आहे. कारण आधीच या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बरीच रक्कम खर्च झाली होती.

कार्तिक बाहेर पडल्याची घोषणा

अलीकडेच निर्मात्यांनी कार्तिक या चित्रपटातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. होती माहिती देताना असे लिहिले होते की काही व्यावसायिक परिस्थितीमुळे आम्ही अद्याप यावर काहीही बोलणार नाही, असा निर्णय घेतला आहे. आम्ही ‘दोस्ताना 2’ पुन्हा कास्ट करणार आहोत. याचे दिग्दर्शन कोलिन डी कुन्हा करणार आहेत. याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल.

‘दोस्ताना 2’ मधून बाहेर पडल्यापासून कार्तिक आर्यन यांनी कोणतेही विधान केलेले नाही. या संपूर्ण घटनेवर कार्तिक शांत आहे. मात्र, कार्तिक चित्रपटातून बाहेर पडल्याने पुन्हा एकदा करण जोहर लोकांच्या निशाण्यावर आहे. सोशल मीडियावरील चाहत्यांनी या प्रकरणामुळे करणवर जोरदार निशाणा साधला आहे. लोकांनी ‘दोस्ताना 2’वर बहिष्कार टाकणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.

(Akshay Kumar Replaced Kartik Aaryan in Karan Johar upcoming film Dostana 2)

हेही वाचा :

Indian Idol 12 | जितकं गॉसिप होईल, तितकाच टीआरपी वाढेल! कुमार सानूने उडवली ‘इंडियन आयडॉल 12’ची खिल्ली

Kartik Aaryan | कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आगामी ‘सत्यनारायण की कथा’मध्ये झळकणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.