सुनील शेट्टीचा मुलगा अहानच्या ‘तडप’ चित्रपटाचे पोस्टर शेअर, अक्षय कुमार म्हणतो…
अभिनेता सुनील शेट्टीचा (Sunil Shetty) मुलगा अहान शेट्टीचा (Ahan Shetty) पहिला चित्रपट ‘तडप’चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
मुंबई : अभिनेता सुनील शेट्टीचा (Sunil Shetty) मुलगा अहान शेट्टीचा (Ahan Shetty) पहिला चित्रपट ‘तडप’चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात तारा सुतारिया (Tara Sutaria) अहानसोबत दिसणार आहे. अहानच्या या चित्रपटाचे पोस्टर अक्षय कुमारने देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करताना अक्षयने लिहिले आहे की, अहान तुझ्यासाठी हा दिवस खूप मोठा आहे. (Akshay Kumar shared a poster of Ahan Shetty’s movie ‘Tadap’ on social media)
अक्षय कुमारने शेअर केलेली पोस्ट
Big day for you Ahan…I still remember seeing your father, @SunielVShetty’s first film, Balwaan’s poster and today I’m presenting yours…. so happy and proud to share the poster of #SajidNadiadwala‘s #Tadap *ing #AhanShetty and @TaraSutaria, releasing in cinemas on 24th Sept! pic.twitter.com/UQZWV7i4Pm
— Akshay Kumar (@akshaykumar) March 2, 2021
मला अजूनही तुझ्या वडीलांचे सुनील शेट्टी यांचा पहिला चित्रपट बलवान याचे पोस्टर आठवते आणि आज मी तुझ्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत आहे. साजिद नाडियाडवाला यांच्या या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना मला खूप आनंद होत आहे आणि अभिमान वाटतो. अहान शेट्टी आणि तारा सुतारिया यांचा हा चित्रपट 24 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट तेलगू सुपरहिट फिल्म ‘RX100’ चा हिंदी रिमेक आहे.
हा चित्रपट यावर्षी 24 सप्टेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे हे पोस्टर तारा सुतारियाने सोशल मीडियावर शेअर असून तिने लिहिले आहे की, ‘असंख्य भावना असलेली एक प्रेम कथा. अविश्वसनीय लव्ह स्टोरी 24 सप्टेंबर 2021 रोजी चित्रपटगृहात रिलीज होत आहे. ताराबरोबर अहाननेही हे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करताना त्याने चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक मिलन लुथरिया यांचे आभार मानले आहेत.
अहान ‘तडप’ या चित्रपटात भूमिका करणार हे तीन वर्षांपूर्वीच जाहिर करण्यात आले होते. मात्र, काही दिवस हा चित्रपट लटकला होता. 2019 मध्ये तारा सुतारिया या चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले पण पुन्हा या चित्रपटाचे शूट लॉकडाउनमध्ये होऊ शकले नाही. चित्रपटाविषयी दिग्दर्शक मिलन यांनी सांगितले की, त्यांनी हा चित्रपट मूळ तेलगू चित्रपटापासून रुपांतरित केला आहे जेणेकरुन तो हिंदी प्रेक्षकांना आवडेल.
संबंधित बातम्या :
अजय देवगणची गाडी रोखणाऱ्या तरुणाला जामीन, काय आहे प्रकरण
ट्रोल करणाऱ्या सुशांतच्या चाहत्यांना अंकिता लोखंडेचे उत्तर, पाहा व्हिडीओ
शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा, कंगनाची याचिका
(Akshay Kumar shared a poster of Ahan Shetty’s movie ‘Tadap’ on social media)