Akshay Kumar Tobacco Controversy: अक्षय कुमारने तंबाखू ब्रँडच्या जाहिरातीतून घेतली माघार; म्हणाला, ‘मला माफ करा..’

आपल्या फिटनेससाठी ओळखला जाणारा बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या एका जाहिरातीमुळे वादात अडकला आहे. तंबाखूच्या (tobacco brand) जाहिरातीमुळे तो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Akshay Kumar Tobacco Controversy: अक्षय कुमारने तंबाखू ब्रँडच्या जाहिरातीतून घेतली माघार; म्हणाला, 'मला माफ करा..'
Akshay KumarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 9:41 AM

आपल्या फिटनेससाठी ओळखला जाणारा बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या एका जाहिरातीमुळे वादात अडकला आहे. तंबाखूच्या (tobacco brand) जाहिरातीमुळे तो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अक्षयने तंबाखूची जाहिरात केली होती आणि त्यामुळेच त्याचे चाहते नाराज झाले आहेत. नेटकऱ्यांनी या जाहिरातीमुळे अक्षयला खूप ट्रोल केलं. त्यानंतर आता अक्षयने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत त्याने चाहत्यांची माफीसुद्धा मागितली आहे. “मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि शुभचिंतकांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांपासून तुमच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रियांमुळे मी अस्वस्थ झालोय. मी तंबाखूचं समर्थन करत नाही आणि भविष्यात करणारही नाही. विमल इलायचीच्या जाहिरातीवर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचा मी सन्मान करतो”, असं त्याने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं आहे. (brand ambassador)

अक्षय कुमारचा माफीनामा-

या पोस्टमध्ये अक्षयने पुढे लिहिलं, “मी विनम्रतेने या जाहिरातीतून माघार घेतो. या जाहिरातीतून मिळालेलं मानधन मी चांगल्या कामासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. कायदेशीर पद्धतींनुसार ब्रँडकडून ती जाहिरात ठरलेल्या वेळेपर्यंत दाखवली जाईल. पण भविष्यात जाहिराती आणि प्रोजेक्ट्सची निवड करताना मी अधिक जागरूक राहीन याचं आश्वासन देतो. या बदल्यात मला तुमच्याकडून फक्त प्रेम आणि आशीर्वाद हवा आहे.”

इन्स्टा पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारने केलेल्या या जाहिरातीत त्याच्यासोबत अभिनेता शाहरुख खान आणि अजय देवगण हे कलाकारसुद्धा होते. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती.

हेही वाचा:

Sher Shivraj Review: ‘शेर शिवराज’ची दुमदुमणारी गर्जना; बरंच काही शिकवून जातो प्रतापगडाचा रणसंग्राम

पेट्रोल-डिझेलसाठीची पळापळ थांबवा.. लवकरच वीज, हवा, गॅसवर वाहने धावतील!

Non Stop LIVE Update
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.