अक्षयची ‘बेल बॉटम’ दहशतवादी घटनेवर आधारीत; वाचा चित्रपटाची कहाणी! 

अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'बेल बॉटम' (Bell Bottom) चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. बेल बॉटम गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे

अक्षयची 'बेल बॉटम' दहशतवादी घटनेवर आधारीत; वाचा चित्रपटाची कहाणी! 
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 9:15 AM

मुंबई : अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. बेल बॉटम गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सुरूवातीला चित्रपटाची रिलीज तारीख 2 एप्रिल घोषित करण्यात आली होती. त्यानंतर ती तारीक रद्द करण्यात आली. मध्यंतरी एक चर्चा होती की, चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाणार आहे. मात्र, आता परत एकदा चित्रपटाची तारीख जाहिर करण्यात आली आहे. (Akshay Kumar’s Bell Bottom will be released on May 28, 2021)

यावर्षी मे महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. अक्षयने कोरोनाच्या काळात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती.  रणजित तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट 28 मे 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता आणि आदिल हुसेन हे या चित्रपटात दिसणार आहेत.

यापूर्वी 2 एप्रिल 2021 रोजी हा चित्रपट गुड फ्रायडेला रिलीज होणार होता, परंतु नंतर सुर्यवंशी चित्रपटाची तारीख देखील 2 एप्रिल 2021होण्याची शक्यता असल्यामुळे बेल बॉटमची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता सध्या चित्रपटाच्या एडिटिंगचे काम सुरू आहे. आणि चित्रपटाच्या रिलीजची घोषणाही करण्यात आली आहे. बेल बॉटम हा थ्रिलर चित्रपट आहे. अक्षय कुमार या चित्रपटात रॉएजंटची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाची कहाणी बेल तळाची संबंधीत आहे. सप्टेंबर 1981 ते ऑगस्ट 1984 या विमान हाइजॅकिंगवर आधारित आहे. या हाइजॅकिंगनंतर संपूर्ण देश हादरला होता. या हाइजॅकिंगची जबाबदारी दहशतवादी संघटनांनी घेतली होती. त्यावेळी सत्तेत असलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेचा लारा दत्ता दिसणार आहे. या चित्रपटात वाणी अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाचे वशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मधु भोजवानी आणि निखिल अडवाणी हे निर्माते आहेत. लॉकडाऊनमध्ये अक्षयनं स्कॉटलंडला जाऊन चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण केलं. एवढंच नाही तर अक्षयनं यावेळी डबल शिफ्टमध्ये काम केलंय. अक्षयनं हे केलं कारण लॉकडाऊनमुळे या कामाला आधीच उशीर झाला होता आणि यामुळे निर्मात्यांचं नुकसान होण्याची शक्यता होती, त्यामुळे अक्षयसोबतच संपूर्ण टीमनं डबल शिफ्टमध्ये काम केलं होत.

संबंधित बातम्या : 

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईन : रामदास आठवले

ना कन्यादान, ना पारंपरिक रितीरिवाज, मंगलाष्टिका म्हणायला महिला भटजी, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जगावेगळा विवाह सोहळा

Jhund movie : प्रतीक्षा संपली, नागराजच्या ‘झुंड’च्या प्रदर्शनाची तारीख बिग बींकडून जाहीर

(Akshay Kumar’s Bell Bottom will be released on May 28, 2021)

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.