ब्रह्मास्त्रचा रेकॉर्ड पठाण चित्रपटाने तोडल्यानंतर आलिया भट्ट हिने केले अत्यंत मोठे विधान, म्हणाली…

सर्वांनी या वादावर शांत राहवे पसंद केले. काही बाॅलिवूड निर्मात्यांनी देखील पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे पाहून निशाणा साधला होता.

ब्रह्मास्त्रचा रेकॉर्ड पठाण चित्रपटाने तोडल्यानंतर आलिया भट्ट हिने केले अत्यंत मोठे विधान, म्हणाली...
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 8:11 PM

मुंबई : बाॅलिवूडचा पठाण (Pathaan) हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर तूफान कमाई करत अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर करताना दिसत आहे. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा हंगामा झाल्याचे बघायला मिळाले. लोकांचा रोष या चित्रपटाबद्दल सतत वाढताना दिसत होता. अनेकांनी या चित्रपटाच्या विरोधात आंदोलने करत या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची थेट मागणी केली होती. या दरम्यान अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan याला तर जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या. काहींनी दीपिका पादुकोण हिला टार्गेट केले होते. बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. सर्वत्र शाहरुख खान आणि पठाण चित्रपटावर लोक टिका करत होते. त्यावेळी शाहरुख खान, दीपिका पादुकोण किंवा पठाण चित्रपटाशी संबंधीत कोणीही काही भाष्य केले नाही. सर्वांनी या वादावर शांत राहवे पसंद केले. काही बाॅलिवूड निर्मात्यांनी देखील पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे पाहून निशाणा साधला होता.

पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चित्रपटाच्या विरोधात वातावरण बघायला मिळत होते. मात्र, जेंव्हा प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाला आणि बाॅक्स आॅफिसवर फक्त आणि फक्त पठाण चित्रपटाचीच क्रेझ बघायला मिळाली.

हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाला रिलीज होऊन फक्त सहा दिवस झाले असताना देखील चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर नोंदवले आहेत. या चित्रपटाला फक्त देशामध्येच नाही तर विदेशातही प्रेम मिळत आहे.

विशेष बाब म्हणजे शाहरुख खान याने या चित्रपटाचे प्रमोशन केले नव्हते. फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातूनच शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. असे असताना देखील चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी नक्कीच केलीये.

पठाण या चित्रपटाने जगभरातून तब्बल ५९१ कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन आतापर्यंत केले आहे. पठाण चित्रपटाच्या यशानंतर बाॅलिवूडमधील अनेकांनी शाहरुख खान याचे काैतुक केले आहे. यावेळी आलिया भट्ट हिला विचारण्यात आले की, पठाण या चित्रपटाने ब्रह्मास्त्रचा रेकॉर्ड तोडला आहे…आलिया भट्ट म्हणाली की, चित्रपट हे रेकॉर्ड तोडण्यासाठीच असतात.

आलिया भट्ट हिने नुकताच पठाण चित्रपटाचे काैतुक करत म्हटले आहे की, आम्ही खूप जास्त खुश नक्कीच आहोत…पठाण हा केवळ ब्लॉकबस्टर नाही, तर भारतीय चित्रपटातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे…यावेळी कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या लोकांना पठाण चित्रपटासाठी टाळ्या वाजवण्यासही आलिया भट्ट हिने सांगितले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.