Ranbir Alia Wedding Photos: ‘मूव्ही नाईट्स, सिली फाईट्स, वाईन डिलाईट्स एन्ड…’ लग्न बंधनात अडकताच आलियाची इन्टापोस्ट! वाचा…

Ranbir Alia Wedding Photos: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आज (14 एप्रिल) लग्नबंधनात अडकले. 'वास्तू' या रणबीरच्या निवासस्थानीच या दोघांनी लग्नगाठ बांधली. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.

Ranbir Alia Wedding Photos: 'मूव्ही नाईट्स, सिली फाईट्स, वाईन डिलाईट्स एन्ड...' लग्न बंधनात अडकताच आलियाची इन्टापोस्ट! वाचा...
Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 9:58 PM

Ranbir Alia Wedding Photos: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आज (14 एप्रिल) लग्नबंधनात अडकले. ‘वास्तू’ या रणबीरच्या निवासस्थानीच या दोघांनी लग्नगाठ बांधली. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. लग्न पार पडल्यानंतर आलियाने लग्नसोहळ्यातील काही क्षण इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या लग्नाच्या फोटोंची चाहत्यांमध्ये फार उत्सुकता होती. लग्नातील पोशाखासाठी रणबीर-आलियाने मोती रंगाला पसंती दिली. आलियाने यावेळी लेहंगा परिधान केला असून रणबीर हा शेरवानी आणि साफाच्या लूकमध्ये पहायला मिळाला. या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आलियाची पोस्ट-

‘आमचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या साक्षीने आज आम्ही आमच्या आवडत्या जागी, ज्याठिकाणी आम्ही आमच्या रिलेशनशिपची पाच वर्षे व्यतीत केली, त्या बाल्कनीमध्ये लग्नगाठ बांधली. अनेक आठवणी एकमेकांसोबत विणण्यासाठी आम्ही दोघं उत्सुक आहोत. आठवणी ज्या प्रेमाने, हास्याने, आनंदाने, मूव्ही नाईट्सने, छोट्यामोठ्या भांडणांनी, वाईन्सने, चायनीचने आणि शांततेने परिपूर्ण असतील. आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या काळात दिलेल्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. यामुळे हा क्षण अधिक खास झाला आहे. प्रेम- रणबीर आणि आलिया’, अशा शब्दांत आलियाने भावना व्यक्त केल्या आहेत.

पहा लग्नाचे फोटो-

2018 मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त रणबीर-आलिया एकत्र आले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. पाच वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. रणबीर आणि आलिया हे 2020 मध्येच लग्न करणार होते. मात्र रणबीरचे वडील ऋषी कपूर यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी लग्न पुढे ढकललं. त्यातच ऋषी कपूर यांचं कर्करोगाने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी आलिया आणि रणबीरने लग्न केलं. ऋषी कपूर आज असते तर त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नसता, अशी प्रतिक्रिया अभिनेते शक्ती कपूर यांनी दिली. तर आजच्या दिवशी चिंटूची (ऋषी कपूर) खूप आठवण येतेय, अशी भावना रणधीर कपूर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा:

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नाचा सर्वांत हटके मेन्यू

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नात सेलिब्रिटींचा थाट, पहा फोटो

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.