Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RRRवरून आलियाचं राजामौलींसोबत वाजलं; रागाच्या भरात डिलिट केले चित्रपटाचे सर्व पोस्ट

बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने 'RRR' या एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने जगभरात जवळपास 490 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

RRRवरून आलियाचं राजामौलींसोबत वाजलं; रागाच्या भरात डिलिट केले चित्रपटाचे सर्व पोस्ट
Alia Bhatt and SS RajamouliImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 5:25 PM

बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने ‘RRR’ या एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने जगभरात जवळपास 490 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आलियाने यामध्ये सीता ही भूमिका साकारली आहे. मात्र या चित्रपटात तिला फारसा स्क्रीन स्पेस न मिळाल्याने ती राजामौलींवर नाराज झाल्याचं कळतंय. ‘RRR’च्या एडिटिंगदरम्यान आलियाचे अनेक सीन्स कट केले असून पडद्यावरील तीन तासांच्या चित्रपटात तिच्या वाट्याला फारशी दृश्ये आली नाहीत. याच गोष्टीमुळे नाराज असलेल्या आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर RRR चित्रपटासंबंधिचे सर्व पोस्ट्स डिलिट केल्याचं म्हटलं जातंय. आलियाने इन्स्टाग्रामवर राजामौली यांना अनफॉलो केल्याचीही चर्चा आहे.

RRR प्रदर्शित होण्यापूर्वी आलियाने ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्यासोबत मिळून चित्रपटाचं भरभरून प्रमोशन केलं होतं. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तिने त्याबद्दल कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. आलियाचा बॉलिवूडमधील स्टारडम पाहता तिला टॉलिवूड चित्रपटात राजामौलींनी अपेक्षित असं स्थान दिलं नाही. त्यामुळे तिचं नाराज होणं स्वाभाविक असल्याचं मत काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मांडलंय. आलियासोबतच या चित्रपटात अजय देवगण, मकरंद देशपांडे या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

आलिया नाराज असल्याच्या चर्चांमध्ये कितपत तथ्य?

आलियाने राजामौलींना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या चर्चा आहेत. मात्र आलिया अजूनही त्यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहे. आलियाच्या इन्स्टा पोस्टवर RRR विषयीचे पोस्ट जरी दिसत नसले तरी तिने इन्स्टा स्टोरीमध्ये या चित्रपटाचा एक पोस्ट शेअर केला आहे. त्यामुळे आलिया खरंच नाराज आहे की नाही, याचं उत्तर ती स्वत: चाहत्यांना देऊ शकेल.

आलियाच्या भूमिकेबद्दल राजामौली काय म्हणाले होते?

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी राजामौलींनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आलियाच्या भूमिकेविषयी वक्तव्य केलं होतं. ‘एखादी भूमिका किती मोठी आहे यावरून त्याचं महत्त्व ठरवू शकत नाही. आलिया भट्ट आणि अजय देवगण या दोघांच्या भूमिका खूप महत्त्वाच्या आहेत. आपण जर RRR कडे शरीर म्हणून पाहिलं, तर अजय सरांची भूमिका ही त्याच्या आत्म्यासारखी आहे. या चित्रपटात दोन पॉवरहाऊस आहेत आणि त्या दोघांमध्ये संतुलन राखण्याचं काम सीता म्हणजेच आलियाची भूमिका करते. मी प्रेक्षकांना यावरून फसवणार नाही. पण चित्रपटात त्यांच्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिका आहेत. पण त्या भूमिकांचं महत्त्व हे कोणा हिरोपेक्षा कमी नाही. किंबहुना त्या त्या ठिकाणी ते हिरोंपेक्षाही अधिक महत्त्वाचे आहेत’, असं राजामौली म्हणाले होते.

हेही वाचा:

“डोकं घरी ठेवून आलात वाटतं”; भर पत्रकार परिषदेत पत्रकारावर चिडला जॉन

6 ऑस्कर जिंकलेल्या Dune चित्रपटाचं भारत कनेक्शन; नमित मल्होत्रा यांची अभिमानास्पद कामगिरी!

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.