Pushpa The Rise : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा प्रेक्षकांसोबतच सेलिब्रिटींनाही चढला ज्वर..

अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा 'पुष्पा' (Pushpa The Rise) चित्रपट रिलीज होण्यास आता फक्त एक दिवस बाकी आहे. मोठी क्रेझ या चित्रपटाची पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया (Social Media) असो की मीडिया, सर्वत्र या चित्रपटाची चर्चा होत आहे.

Pushpa The Rise : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'चा प्रेक्षकांसोबतच सेलिब्रिटींनाही चढला ज्वर..
पुष्पा : द राइज
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 5:57 PM

मुंबई : अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा ‘पुष्पा’ (Pushpa The Rise) चित्रपट रिलीज होण्यास आता फक्त एक दिवस बाकी आहे. मोठी क्रेझ या चित्रपटाची पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया (Social Media) असो की मीडिया, सर्वत्र या चित्रपटाची चर्चा होत आहे. प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. तसेच सेलिब्रिटींमध्येही या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी व्यक्त होत आहेत. हा चित्रपट उद्या म्हणजेच 17 डिसेंबर 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

साई धरम तेज अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच धुमाकूळ घातला आहे. ते पाहता या वर्षाची अखेर हिट चित्रपटाने होणार आहे. साऊथचा अभिनेता साई धरम तेज याने सोशल मीडियावर अल्लू अर्जुनसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे आणि त्याच्या चित्रपटाचा आणि त्याने चित्रपट बनवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचा उल्लेख केला आहे. त्याने संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या.

‘मेहनतीचे फळ आनंददायी असावे’ साई धरम तेजने ट्विट केले, की टीम पुष्पाने यासाठी घाम गाळला आहे. बन्नी अल्लू अर्जुन तुझ्या मेहनतीचे फळ आनंददायी असावे अशी माझी इच्छा आहे. सलाम सुकुमारन सर आणि देवी प्रसाद, रश्मिका मंदाना यांनी समर्पणाने आपले सर्वोत्तम दिले आहे. त्याने टीममधील सर्व लोकांना टॅग केले आहे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

विजय देवरकोंडा साऊथ स्टार विजय देवरकोंडाने पुष्पाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले, की पुष्पासाठी 2 दिवसांपासून उत्साही आहे. ट्रेलर, गाणी, व्हिज्युअल्स, परफॉर्मन्स हे सर्व महत्त्वाचे आहे. तेलुगू सिनेमा खूप पुढे गेला आहे. या चित्रपटाच्या यशासाठी मी खूप खूप शुभेच्छा देत आहे. त्यांनी या ट्विटमध्ये सर्व सदस्यांना एकत्र करून टॅग केले आहे.

संदीप किशन अभिनेता संदीप किशननेदेखील अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले की मी माझे आवडते जोडपे अल्लू अर्जुन आणि सुकुमार सर यांना पाहण्यासाठी उत्साहित आहे. हा चित्रपट उद्या पडद्यावर येतोय. संपूर्ण देश पुष्पाची आतुरतेने वाट पाहत आहे. यासोबतच त्यांनी रश्मिका मंदानाचेही कौतुक केले आहे.

Pushpa The Rise : फुल्ल चर्चा! एका क्लिकवर ऐका पुष्पा चित्रपटातल्या ‘या’ गाण्याचे व्हर्जन

Spider-Man No Way Home review : टॉम हॉलंडची चालली जादू, जाणून घ्या कसा आहे स्पायडर मॅन चित्रपट

दादाशी पंगा घेणारा विराट BCCI च्या फोटोंमधून गायब, हा इशारा का?

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.