Jhund first Song : अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चं पहिलं गाणं रिलीज, तीन तासात तीन लाखांपार

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला 'झुंड' या चित्रपटाचं पहिलं गाणं आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रिलिज झालं आहे. तीन तासात या गाण्याला तीन लाखांहून जास्त लोकांनी पाहिलं आहे.

Jhund  first Song : अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या 'झुंड'चं पहिलं गाणं रिलीज, तीन तासात तीन लाखांपार
आया ये झुंड है- झुंड
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 3:21 PM

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड(Jhund) हा चित्रपट येत्या 8 मार्चला रिलीज (Jhund release 4 march) होणार आहे. या चित्रपटाचं पहिलं गाणं आज व्हॅलेंटाईन डेच्या (Valentines Day) दिवशी रिलिज झालं आहे. ‘आया ये झुंड है’ (Aaya Ye Jhund Hai), असे या गाण्याचे बोल आहे. अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तर अतुल गोगावलेने हे गाणं गायलं आहे. या गाण्याला चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. तीन तासात या गाण्याला तीन लाखांहून जास्त लोकांनी पाहिलं आहे. हे गाणं आवडल्याचं यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अनेकांनी सांगितलं आहे. या चित्रपटाबाबत सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

‘आया ये झुंड है’ गाणं रिलीज

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपट येत्या 8 मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं पहिलं गाणं आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रिलिज झालं आहे. ‘आया ये झुंड है’, असे या गाण्याचे बोल आहे. अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तर अतुल गोगावलेने हे गाणं गायलं आहे. या गाण्याला चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. तीन तासात या गाण्याला तीन लाखांहून जास्त लोकांनी पाहिलं आहे.

सिनेरसिकांच्या प्रतिक्रिया

‘आया ये झुंड है’ गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. अतुल गोगावले यांच्या आवाजातील हे गाणं आवडल्याचं यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अनेकांनी सांगितलं आहे. एकाने या गाण्यामुळे सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली असल्याचं म्हटलंय. तर एकाने अतुल गोगावले यांचा आवाज अफलातून असल्याचं म्हटलंय. तर काहींना अमिताभ यांचा अंदाज आवडलाय. अश्याच कमेंट्सने या गाण्याचा यूट्यूबवरचा कमेंट बॉक्स ओसंडून वाहतोय. दीड हजारांहून अधिक जणांनी कमेंट करत गाणं आवडल्याचं सांगितलंय.

सिनेमा गोष्ट

हा सिनेमा झोपडपट्टीत राहणारी मुलं आणि त्यांचे क्रीडा प्रशिक्षक यांच्यावर बेतलेला आहे. अमिताभ बच्चन हे क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे. नागराज मंजुळे यांना या सिनेमाची कथा लिहिण्यासाठी दोन वर्षांचा वेळ लागला. या चित्रपटाची कथा लिहिताना अमिताभ बच्चन यांना डोळ्यासमोर ठेवून या सिनेमातील प्रशिक्षकाचं पात्र नागराज मंजुळे यांनी लिहिलं आणि आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी साकारलेलं विजय बारसे हे पात्र घेऊन सिनेमा 4 मार्चला प्रदर्शित होतोय. हा सिनेमा विजय बारसे आणि त्यांचे शिष्य यांच्यावर आधारित आहे.

4 मार्चला प्रदर्शित होणार

बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला झुंड हा चित्रपट येत्या 8 मार्चला रिलीज होतोय. या सिनेमाबद्दल सिनेरसिकांमध्ये उत्सुकता आहे त्यामुळे प्रदर्शनानंतर या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो पहावं लागेल.

संबंधित बातम्या

तुम्हाला सोमवारी कामाचा कंटाळा येतो?, वैदेही परशुरामीचा हा फंडा वापरा आणि व्हा फ्रेश!

इम्रान हाश्मी नाही हो, भारतीय सिनेमातील सर्वात दीर्घकाळ चाललेला Kissing सीन माहितेय का? जाणून घ्या किस का किस्सा

Aai Kuthe Kay Karte : अन् अखेर तो क्षण आला… अरुंधती सोडणार देशमुखांचं घर

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.