AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांची नात नव्याने घेतला करिअर संदर्भात ‘हा’ मोठा निर्णय!

बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते.

अमिताभ बच्चन यांची नात नव्याने घेतला करिअर संदर्भात 'हा' मोठा निर्णय!
| Updated on: Feb 17, 2021 | 12:20 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. नव्याने अद्याप बॉलिवूडमध्ये प्रवेश केला नाही तरी देखील तिच्या नावाचे अनेक फॅन पेज तयार करण्यात आले आहेत. प्रत्येकजण नव्याच्या बॉलिवूड एन्ट्रीची वाट पाहत आहे. मात्र, आता याबाबतची मोठी बातमी आली आहे. नव्याचा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचा काही प्लॅन नसून नव्या तिचे वडिल निखिल नंदाच्या व्यवसायात मदत करणार आहे. (Amitabh Bachchan’s granddaughter Navya Naveli Nanda took a big career decision)

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नव्या म्हणाली की, तिच्या कुटुंबाची चौथी पिढी पुढे जात आहे आणि एक स्त्री वारसा पुढे घेऊन जात आहे याचा खूप आनंद झाला आहे. नव्या मानसिक आरोग्य आणि महिला हक्कांसाठी सोशल मीडियावर नेहमीच कार्यरत असते. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे कौतुक नव्याने केले होते. नव्याने निर्मला सीतारमण यांच्या बजेटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतमध्ये एका महिला पत्रकाराला एका व्यक्तीने प्रश्न विचारताना रोखले होते. त्यावेळी निर्मला सीतारमण त्या व्यक्तीवर चांगल्याच भडकल्या होत्या. नव्याने निर्मला सीतारमण यांचे कौतुक केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून नव्या आणि मीजान यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा सुरू आहे. आणि दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे ही सांगितले जात होते. नव्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवर मीजानने दिलेली कमेंट बघून तर अजूनच चर्चांना उधाण आले होते.

नव्या आणि मीजान यांच्या रिलेशन शिपवर जावेद जाफरी यांनी भाष्य केलं आहे. जावेद जाफरी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, दोघे शाळेपासूनचे मित्र आहेत दोघे एकाच शाळेत शिकलेले आहेत त्या दोघांचे फ्रेंड सर्कल देखील एकच आहे सर्व मित्र-मैत्रिण मिळून रात्री 3 पर्यंत पार्ट्यासोबतच करतात. आणि ते दोघे फक्त चांगले मित्रच आहेत.

संबंधित बातम्या : 

Video : ‘धाकड’ चं शूटिंग संपताच कंगना निघाली शॉपिंगला, खरेदी केला हा खास ‘आयटम’

Video : नेहा कक्करच्या पतीचा ऑन स्टेज रोमान्स, असं गाणं गायलं की केला प्रेमाचा वर्षाव!

Aashram : प्रकाश झा यांना मोठा दिलासा, राजस्थान हायकोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय

(Amitabh Bachchan’s granddaughter Navya Naveli Nanda took a big career decision)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.