Jhund: ‘झुंड’ची IMDb रेटींग नाही म्हणून खूश होणाऱ्यांनो, आताची रेटींग बघितली का? बच्चन बाबा खूश!

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर लगेचच प्रेक्षकांमध्ये दोन गट पडले. काहींना हा चित्रपट खूप आवडला तर काहींनी त्यावरून टीका केली. 'झुंड' हा बॉलिवूडमधला असा चित्रपट आहे, जो तुम्हाला आवडला असो वा नसो, पण त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही.

Jhund: 'झुंड'ची IMDb रेटींग नाही म्हणून खूश होणाऱ्यांनो, आताची रेटींग बघितली का? बच्चन बाबा खूश!
JhundImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 12:06 PM

Love It Or Hate It But You Can’t Ignore It… हे वाक्य नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाला तंतोतंत लागू पडतं. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर लगेचच प्रेक्षकांमध्ये दोन गट पडले. काहींना हा चित्रपट खूप आवडला तर काहींनी त्यावरून टीका केली. ‘झुंड’ हा बॉलिवूडमधला असा चित्रपट आहे, जो तुम्हाला आवडला असो वा नसो, पण त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. या चित्रपटावरून सोशल मीडियावर विविध मतमतांतरे पहायला मिळत आहेत. असं असलं तरी चित्रपटाच्या कथेकडे, त्यातील कलाकारांच्या दमदार कामाकडे आणि चित्रपटातील भावनेकडे अनेकांनी लक्ष वेधलं आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कमाई दहा कोटींकडे जात असतानाच आता आयएमडीबी रेटिंगसुद्धा 9.3 इतकी पहायला मिळत आहे.

IMDb रेटिंग म्हणजे काय? ती का महत्त्वाची?

आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. आयएमडीबी हा ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. या प्लॅटफॉर्मवर स्टार्स पद्धतीने रेटिंग दिलं जातं. 10 हे सर्वाधिक रेटिंग असून चित्रपट, मालिका, वेब सीरिज, व्हिडीओ गेम्स अशा विविध गोष्टींना इथं रेटिंग देता येतं. आयएमडीबीचं रेटिंग जितकं अधिक तितका तो चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज लोकांना भावल्याची पोचपावती असते. त्यामुळे ‘झुंड’ला 10 पैकी मिळालेलं 9.3 रेटिंग हे सर्वोत्तम आहे, असं म्हणायला हरकत नाही.

अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया

ट्विटर, फेसबुकवर अनेकांनी ‘झुंड’ या चित्रपटावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘झुंड’ हा चित्रपट अप्रतिम असून आयएमडीबी रेटिंग 9.3 इतकी आहे, असं सांगणाऱ्या एका नेटकऱ्याला बिग बींनी ‘मी कृतज्ञ आहे’ असं म्हटलंय. ‘झुंडची टीम सर्वांची मनं जिंकतेय’ असं एकाने ट्विटरवर लिहिलंय. त्यावर कमेंट करत अमिताभ बच्चन यांनी लिहिलं, ‘मी भारावून गेलो आहे.’

नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. या कल्पनेत कितीही विरोधाभास असला तरी त्यांनी हा प्रयोग सत्यात उतरवला आहे. छाया कदम, किशोर कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार, कलाकारांच्या नजरेतले भाव अचूक टिपणारी सुधाकर रेड्डी यांची सिनेमॅटोग्राफी आणि अजय-अतुल या जोडगोळीच्या संगीताची योग्य जोड या चित्रपटाला मिळाली आहे.

‘झुंड’ची कमाई

पहिला दिवस- 1.50 कोटी रुपये दुसरा दिवस- 2.10 कोटी रुपये तिसरा दिवस- 2.90 कोटी रुपये चौथा दिवस- 1.20 कोटी रुपये पाचवा दिवस- 1.30 कोटी रुपये एकूण- 9.00 कोटी रुपये

हेही वाचा:

‘जात.. जात नाही तोवर…’; नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वर टीका करणाऱ्यांना केदार शिंदेंचं सडेतोड उत्तर

‘नागराज मंजुळे भावा.. त्या ओळी मनातून जातच नाहीत’; ‘झुंड’साठी सिद्धार्थने लिहिलेली पोस्ट वाचली का?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.