दृश्यम 2 चा बाॅक्स ऑफिसवर धमाका सुरूच, भेडिया चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो फ्लाॅप

भेडिया आणि दृश्यम 2 नंतर आयुष्मान खुराना याचा अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो हा चित्रपट रिलीज झालाय.

दृश्यम 2 चा बाॅक्स ऑफिसवर धमाका सुरूच, भेडिया चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो फ्लाॅप
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 3:30 PM

मुंबई : अजय देवगणचा दृश्यम 2 हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर अजूनही धमाका करतोय. दृश्यम 2 नंतर वरुण धवन याचा भेडिया हा चित्रपट रिलीज झालाय. मात्र, दृश्यम 2 या चित्रपटासमोर इतर कोणताच चित्रपट टिकू शकत नाहीये. भेडियाची ओपनिंगही तेवढी खास ठरली नाहीये. भेडिया रिलीज होऊन 11 दिवस झाले आहेत. मात्र, चित्रपटाला बाॅक्स ऑफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. दृश्यम 2 चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असल्याने भेडियाला फटका बसल्याचे सांगितले जात आहे.

भेडिया आणि दृश्यम 2 नंतर आयुष्मान खुराना याचा अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो हा चित्रपट रिलीज झालाय. मात्र, हा चित्रपट तर बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेलाय. या चित्रपटाला काही खास कामगिरी करण्यात यश मिळाले नाहीये.

आयुष्मानच्या अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरोची जेवढी चर्चा होती. तेवढे चित्रपटाचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन नक्कीच झाले नाहीये. 11 व्या दिवशी भेडियाचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन 1.60 कोटी झाले असून हे त्या तुलनेमध्ये अत्यंत कमी आहे.

आयुष्मान खुरानाच्या अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो चित्रपटाचे बाॅक्स ऑफिसवर चाैथ्या दिवशी फक्त 80 लाखांचे कलेक्शन झाले आहे. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेलाय. मात्र, अजूनही अजय देवगणचा दृश्यम 2 जबरदस्त कामगिरी करतोय.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आयुष्मान खुराना म्हणाला होता की, मी असे चित्रपट करतो. जे चित्रपट इतर अभिनेते करत नाही. ते अशा चित्रपटांना करण्यास सरळ सरळ नकार देतात.

इतकेच नाही तर माझे चित्रपट हे बाॅक्स ऑफिसवर फ्लाप गेले तरीही काही खास परिणाम पडत नाही. कारण मुळातच माझे सर्व चित्रपट हे अत्यंत कमी बजेटचे असतात, असेही आयुष्मान खुराना म्हणाला होता.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.