प्रसिद्ध गायक अनु मलिक यांना मातृशोक, शेवटच्या काळात आजीच्या सोबत होता नातू अरमान मलिक
प्रसिद्ध गायक अनु मलिक (Anu Malik) यांची आई कुशर जहां मलिक यांचे निधन झाले. नु मलिक यांचा पुतण्या अर्थात डबू मलिक यांचा मुलगा, प्रसिद्ध गायक अरमान मलिक (Armaan Malik) याने पोस्ट शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बी-टाऊनधून सतत हार्ट ब्रेकिंग बातम्या समोर येत आहेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे याच महिन्यात निधन झाले, त्यानंतर अभिनेता चंकी पांडेची आई देखील स्वर्गवासी झाली. दरम्यान, आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक अनु मलिक (Anu Malik) यांची आई कुशर जहां मलिक यांचे निधन झाले.
अनु मलिक यांचा पुतण्या अर्थात डबू मलिक यांचा मुलगा, प्रसिद्ध गायक अरमान मलिक (Armaan Malik) याने पोस्ट शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे. गायकाच्या आईचे निधन कशामुळे झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान गायक अरमान मलिक यांनी खूप भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने आपल्या आजीला सर्वात चांगली मैत्रीण म्हणून वर्णन केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अरमान आपल्या आजीसोबत दिसला आहे. अरमानचे चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट करून शोक व्यक्त करत आहेत.
पाहा पोस्ट :
View this post on Instagram
अरमान मलिक पोस्टने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज माझी सर्वात चांगली मैत्रीण मी गमावली… माझी आजी. माझ्या आयुष्याचा प्रकाश. या नुकसानाची मी कधीही पूर्तता करू शकत नाही. मला माहित आहे की, ही पोकळी कोणीही भरू शकत नाही. माझ्या आजवरच्या आयुष्यातील तू सर्वात गोड, सर्वात मौल्यवान व्यक्ती होतीस. मी तुझ्याबरोबर इतका वेळ घालवू शकलो या बद्दल मी नेहमीच आभारी आहे. अल्लाह माझा देवदूत आता तुझ्याबरोबर आहे.’
कोण आहे अरमान मलिक?
आजमितीला हिंदी चित्रपटसृष्टीतील आणि संगीत क्षेत्रातील अरमान हा एक अत्यंत उदयोन्मुख संगीतकार आहे. अरमान हा संगीतकार डबू मलिक यांचा मुलगा आहे. अरमान मलिक याने बाल कलाकार म्हणून आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात ‘भूतनाथ’ चित्रपटातील ‘मेरे बडी’ या गाण्यापासून केली. यानंतर अरमानने आयुष्यात मागे वळून पाहिले नाही. सर्वांचा लाडका गायक असणारा अरमान 2005मध्ये ‘सारेगमप लिटील चँप’चा विजेता ठरला होता. अरमानने लहान वयात बर्याच जाहिरातींसाठी जिंगल्सही गायल्या होत्या.
जेव्हा अरमान मलिकचा पहिला सिंगल अल्बम आला, तेव्हा तो अवघ्या 18 वर्षाचा होता. त्याचा पहिला अल्बम ‘अरमान’ होता, जो त्याचा मोठा भाऊ अमल मलिक याने तयार केला होता. अरमानने संगीतातही शिक्षण घेतले आहे.
(Anu Malik, Abu Malik, Daboo Malik mother passes away)
हेही वाचा :
‘I DID NOT QUIT!!’, ‘तारक मेहता…’ सोडल्याच्या चर्चेवर ‘बबिता’ मुनमुन दत्ताची पहिली प्रतिक्रिया!