काय खिचडी शिजत आहे? अनुभव सिन्हा यांनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न

आमिर खान, रणबीर कपूर आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या स्टारचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात आहेत. यामुळे या चित्रपट निर्मात्यांच्या भेटीवर चर्चा होत आहे.

काय खिचडी शिजत आहे? अनुभव सिन्हा यांनी शेअर केलेल्या 'त्या' फोटोवर नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 8:58 PM

मुंबई : चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा (Anubhav Sinha) यांनी सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केलाय. हा फोटो पाहून अनेक चर्चांना उधाण आले असून नक्कीच काहीतरी खिचडी शिजत असल्याचा अंदाजा अनेकांनी बांधला आहे. अनुभव सिन्हा यांनी आतापर्यंत बाॅलिवूडला अनेक हीट चित्रपट दिली आहेत. या फोटोमध्ये फक्त अनुभव सिन्हा हेच नसून अनेक बाॅलिवूडमधील चित्रपट निर्माता देखील दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करू शकत नाहीयेत. दुसरीकडे साऊथचे चित्रपट धमाका करत आहेत. आमिर खान, रणबीर कपूर आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या स्टारचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात आहेत. यामुळे या चित्रपट निर्मात्यांच्या भेटीवर चर्चा होत आहे.

अनुभव सिन्हा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुराग कश्यप, सुधीर मिश्रा, केतन मेहता, सुभाष कपूर, हंसल मेहता हे सर्वजण दिसत आहेत. विशेष म्हणजे हे सर्वजण अनुभव सिन्हा यांच्या घरी जमले होते.

या भेटीमध्ये सर्वांनी फक्त काही विषयावरच चर्चा केली नाहीतर त्यांनी जेवणाचा आनंद देखील घेतला. आता हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट देखील केल्या आहेत.

फोटो शेअर करताना एक खास कॅप्शन देखील अनुभव सिन्हा यांनी लिहिले असून म्हटले आहे की, आज आम्ही जेवणासाठी भेटलो… थंड बिअर देखील घेतली…आणि चित्रपटांबद्दल बोललो. आम्ही लवकरच पुन्हा भेटू…हे लोक नसते तर मी माझ्या चित्रपटांचा विचार करू शकलो नसतो…

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर युजर्सने मोठ्या प्रमाणात कमेंट करत अनेक प्रश्न विचारले आहेत. एका युजर्सने लिहिले की, तुमच्यामध्ये काय खिचडी शिजत आहे? दुसऱ्याने लिहिले की, मलाही बोलवायचे ना जेवणासाठी मी पण थोडी बिअर घेतली असती.

आता अनुभव सिन्हा यांची हिच पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी सर्वांनी चित्रपटांबद्दल देखील गप्पा मारल्या आहेत. कोरोनानंतर बाॅलिवूड चित्रपटांना मोठा फटका बसतोय. फक्त अजय देवगणचा चित्रपट सोडला तर इतर कोणतेच चित्रपट धमाका करू शकले नाहीयेत.

रोहित शेट्टी याच्या प्रत्येक चित्रपटाला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळते. रोहितचे चित्रपट काॅमेडीवर आधारित असतात. मात्र, काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टी याचा रिलीज झालेला सर्कस या चित्रपटाकडे चाहत्यांनी पाठ फिरवली. सर्कस चित्रपटाचे बजेटही निघू शकले नाहीये.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.