मोठ्या पडद्यापासून आणखी काही काळाचा ब्रेक, लेक ‘वामिका’साठी अनुष्का शर्माने घेतले मोठे निर्णय!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून ब्रेक घेतला आहे. ती शेवटच्या वेळी 2018मध्ये शाहरुख खानसोबत 'झिरो' या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर अनुष्काने पुनरागमन केले नाही.

मोठ्या पडद्यापासून आणखी काही काळाचा ब्रेक, लेक ‘वामिका’साठी अनुष्का शर्माने घेतले मोठे निर्णय!
अनुष्का शर्मा
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 11:31 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून ब्रेक घेतला आहे. ती शेवटच्या वेळी 2018मध्ये शाहरुख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर अनुष्काने पुनरागमन केले नाही. आता अनुष्काने तिचा हा ब्रेक आणखी वाढवला आहे. आता तिला आपला संपूर्ण वेळ लेक वामिकाच्या (Vamika) संगोपनात घालवायचा आहे. माध्यमांच्या काही अहवालांनुसार अनुष्काने 2022 पर्यंत आपला हा ब्रेक वाढवला आहे (Anushka Sharma extend her career break for daughter Vamika).

पीपिंगमूनच्या वृत्तानुसार, अनुष्का सध्या आपल्या मुलीच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करत आहे. यावेळी घराबाहेर जाऊन शूटिंग करून तिला कोणताही धोका पत्करायचा नाही. वृत्तानुसार, ऑक्टोबरमध्ये कोरोना विषाणूची तिसरी लाट येणार आहे, ज्याचा अधिक परिणाम लहान मुलांवर होताना दिसत आहे. अनुष्का यावेळी सर्व सेफ्टी प्रोटोकॉलची काळजी घेत आहे आणि घराबाहेर देखील जात नाही. यावर्षी कुठल्याही शूटची योजना आखू नका, असंही तिने आपल्या टीमला सांगितलं आहे.

प्रॉडक्शन हाऊसवर लक्ष केंद्रित करणार!

यावेळी पूर्ण करण्यासाठी अनुष्काकडे कोणतेही अभिनय असाइनमेंट नाहीत. अनुष्का शर्मा निर्माता बनली आहे आणि त्यावर लक्ष केंद्रित करत आहे. अनुष्काचे प्रॉडक्शन हाऊस सतत उत्तम कंटेंट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लवकरच, तिचे नेटफ्लिक्सवर दोन प्रोजेक्ट प्रदर्शित होणार आहेत. यात साक्षी तंवरची ‘माई’ आणि अनविता दत्ताच्या ‘काला’चा समवेश आहे. याद्वारे दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील खान अभिनयाच्या दुनियेत पाऊल टाकणार आहे. याशिवाय अनुष्काचे प्रॉडक्शन हाऊस ‘पाताल लोक 2’ वरही काम करत आहे.

लेक आणि पतीबरोबर वेळ घालवतेय!

अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासमवेत इंग्लंडमध्ये आहे. विराट कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला आहे, अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासुद्धा त्याच्यासोबत गेल्या आहेत. तिथे आनंद घेत असताना अनुष्का फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राहते.

आता अनुष्का शर्मा भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. मागील वर्षी अनुष्काने या चित्रपटाचा प्रोमो शूट केला होता. 2022 मध्ये ‘या’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. याशिवाय अनुष्का आणखी दोन सिनेमांमध्ये काम करताना दिसणार आहे. त्यात एक यशराज फिल्म्सचा चित्रपट आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

(Anushka Sharma extend her career break for daughter Vamika)

हेही वाचा :

Photo : अनुरागची लेक आलियापासून ते अमिताभ यांची नात नव्यापर्यंत, ‘हे’ स्टारकिड्स इंडस्ट्रीपासून लांब तरीही चर्चेत!

TMKOC | ‘दयाबेन’ साकारण्यासाठी ‘खतरों के खिलाडी’च्या ‘या’ अभिनेत्रीला ऑफर! पाहा काय म्हणाली अभिनेत्री…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.