दबंग चित्रपटाबद्दल अरबाज खान याने केली अत्यंत मोठी घोषणा
अरबाज खान याने एका मुलाखतीमध्ये बोलताना मोठी घोषणा करत माहिती देखील सांगितलीये
मुंबई : सलमान खान कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. सलमानची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याला टीव्हीवर पाहण्यासाठी चाहते कायमच आतुर असतात. बिग बाॅस 16 ला सध्या सलमान खान होस्ट करत आहे. आठवड्यातून दोन वेळा बिग बाॅसच्या घरात सलमान खान येतो. विकेंडच्या वार दरम्यानच शोचा टीआरपी वाढतो. सलमानच्या आगामी चित्रपटाची चाहते वाट पाहात आहेत. यामध्ये आता सलमान खानचा भाऊ अरबाज खान याने अत्यंत मोठे अपडेट दिले आहे.
अरबाज खान याने एका मुलाखतीमध्ये बोलताना मोठी घोषणा करत माहिती देखील सांगितलीये. अरबाज खान म्हणाला की, आम्ही तिघे भाऊ जेंव्हा सोबत भेटतो, त्यावेळी आम्ही चित्रपटाबद्दल, शूटिंगबद्दलच बोलत असतो. आमच्यामध्ये कधीच वेगळ्या काही गप्पा होत नाहीत. सध्या आम्ही तिघेही बिझी आहोत. बऱ्याच लोकांना असे वाटते की, हे भेटल्यावर विविध विषयांवर गप्पा मारत असतील. परंतू असे अजिबातच नाहीये.
यावेळी बोलताना अरबाज खान म्हणाला की, दबंग 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दबंग 2 आणि दबंग 3 यायला जेवढा वेळ लागला, तेवढा वेळ यावेळी निश्चित लागणार नाहीये. टायगर 3 मधून सलमान खान फ्री झाला की, आम्ही दबंग 4 वर काम सुरू करणार आहोत. दबंगला कायमच प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला आहे. अरबाज खानचा मुलगा अरहान खान देखील लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.