आदिपुरुषवर ‘हा’ रामही संतापला, चित्रपट निर्मात्यांना थेट खडेबोल…
आदिपुरुषच्या वादात आता अरुण गोविल यांनीही उडी घेतलीये. काही दिवसांपूर्वी आदिपुरुषच्या वादावर अरुण गोविल यांना प्रश्न विचारण्यात आले होते.
मुंबई : ओम राऊत (Om Raut) यांच्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. आदिपुरुष चित्रपटासंबंधित वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये हा वाद वाढतच चाललाय. या चित्रपटाचे टीजर 2 ऑक्टोबर रोजी अयोध्यात रिलीज करण्यात आले असून तेंव्हापासून मोठा वाद निर्माण झालांय. इतकेच नाही तर चित्रपटाचे पोस्टर कॉपी केल्याचाही आरोप करण्यात आलाय. आदिपुरुष हा चित्रपट थिएटरमध्ये चालू देणार नाही, अशा धमक्या देखील सातत्याने दिल्या जात आहे. अनेक ठिकाणी चित्रपटाची (Movie) पोस्टरही जाळण्यात आलीयेत.
आदिपुरुषच्या वादात आता अरुण गोविल यांनीही उडी घेतलीये. काही दिवसांपूर्वी आदिपुरुषच्या वादावर अरुण गोविल यांना प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी काहीही भाष्य केले नव्हते. मात्र, आता आदिपुरुष चित्रपटावर अरुण गोविल यांनी मोठे भाष्य करत निर्मात्यांवर टीका केलीये. प्रसिद्ध टीव्ही मालिका रामायणमध्ये भगवान रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविलने याप्रकरणी आता मौन सोडलंय.
अरुण गोविल म्हणाले की, गेल्या बऱ्याच दिवसांपासून माझ्या डोक्यात अनेक गोष्टी सुरू होत्या आणि शेवटी मी ते तुमच्यासोबत शेअर करतोय. रामायण, महाभारत यासारखे सर्व धर्मग्रंथ आपली सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा आहेत. हीच आपली संस्कृती आहे, हेच आपले मूळ आहे. हे सर्व आपले मूळ आणि मूळाला कधीच हलवे जाऊ शकत नाही. तो आपला पाया आहे आणि असे करणेही चुकीचे आहे. या ग्रंथांमधून आपल्याला संस्कार आणि जगण्याचा आधार मिळालांय. ही आपली जुनी संस्कृती आहे.