Anand Bhosle: आशा भोसले यांचा मुलगा रुग्णालयात दाखल; शुद्ध हरपल्याने जमिनीवर कोसळले

गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचा मुलगा आनंद भोसले (Anand Bhosle) यांना दुबईत (Dubai) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आनंद अचानक जमिनीवर कोसळल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Anand Bhosle: आशा भोसले यांचा मुलगा रुग्णालयात दाखल; शुद्ध हरपल्याने जमिनीवर कोसळले
Asha Bhosle with son Anand Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 12:17 PM

गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचा मुलगा आनंद भोसले (Anand Bhosle) यांना दुबईत (Dubai) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आनंद अचानक जमिनीवर कोसळल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असून त्याबद्दलची माहिती आता समोर येत आहे. आनंद यांना दुखापतसुद्धा झाल्याचं कळतंय. त्यांना सुरुवातीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आल्याचं वृत्त ‘ई टाइम्स’ने दिलं आहे. या घटनेनंतर आशा भोसले आणि मंगेशकर कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत. आनंद यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी ते दररोज त्यांना दुबईला कॉल करत आहेत. ही घटना घडली त्यावेळी आशा भोसले या दुबईतच होत्या. मुलाच्या प्रकृती सुधारेपर्यंत त्या तिथेच राहणार असल्याचं कळतंय.

आनंद हे अचानक शुद्ध हरपल्याने जमिनीवर कोसळेल. त्यावेळी त्यांना किरकोळ इजासुद्धा झाली. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आशा भोसले यांना वेळोवेळी रुग्णालयात जाऊन मुलाच्या प्रकृतीची चौकशी करतात. आनंद यांना डिस्चार्ज कधीपर्यंत मिळेल, याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही.

आशा भोसले यांच्या तीन मुलांपैकी आनंद हे सर्वांत लहान आहेत. सर्वांत मोठा मुलगा हेमंत भोसले यांचं 2015 मध्ये कर्करोगाच्या आजाराने निधन झालं. तर मुलगी वर्षा भोसलेनं आत्महत्या केली.

हेही वाचा:

Ranbir Alia Wedding: ‘तुझा छोटा हात धरण्यापासून ते आता..’; रणबीर-आलियाच्या बॉडीगार्ड्सची पोस्ट चर्चेत

Ranbir Alia Wedding: लेकीच्या लग्नानंतर आई सोनी राजदान यांची भावूक पोस्ट; ‘ते म्हणतात की तुम्ही मुलीला..’

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.