शांत स्वभावाच्या लतादिदी जेव्हा मोहम्मद रफींवर भडकल्या, म्हणाल्या, “मी नाही गाणार तुमच्यासोबत”

लतादीदी शांत स्वभावाच्या होत्या. त्या नेहमी मोठ्यांचा आदर करत. पण शांत स्वभावाच्या लतादीदींचं एकदा मोहम्मद रफींबरोबर भांडणं झालं होतं. रॉयल्टीच्या मुद्द्यावरुन त्यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतर अनेक वर्ष दोघांनी सोबत काम केलं नाही.

शांत स्वभावाच्या लतादिदी जेव्हा मोहम्मद रफींवर भडकल्या, म्हणाल्या, मी नाही गाणार तुमच्यासोबत
लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 5:47 PM

मुंबई : आपल्या अलौकिक सूरांनी संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनामुळे संगीतसृष्टीला फार मोठा धक्का बसलाय. लतादीदींनी आपल्या अतुलनीय सूरांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या अनेक पिढ्यांना पडद्यावर आवाज देऊन त्यांचं व्यक्तिमत्व खुलवलं. आपल्या भक्तीगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाई गीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती. प्रदीर्घ काळ पार्श्वगायन क्षेत्रावर त्यांची मोहिनी होती. लतादीदी शांत स्वभावाच्या होत्या. त्या नेहमी मोठ्यांचा आदर करत. पण शांत स्वभावाच्या लतादीदींचं एकदा मोहम्मद रफींबरोबर (Mohammad Rafi) भांडणं झालं होतं. रॉयल्टीच्या मुद्द्यावरुन त्यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतर अनेक वर्ष दोघांनी सोबत काम केलं नाही.

रॉयल्टीच्या मुद्द्यावर साथ देण्यासाठी त्यांच्या मागे इतरही अनेक गायक कलाकार उभे राहिले. संगीत दिग्दर्शकांप्रमाणेच गायकांनाही रॉयल्टी दिली पाहिजे, असे लता दिदींचं मत होतं. रफी साहेबांवर लिहिलेल्या ‘मोहम्मद रफी : माय अब्बा’ या पुस्तकात या प्रसंगाचा उल्लेख आहे. मोहम्मद रफी यांची सून यास्मिन खालिद यांनी लिहिलेल्या या पुस्तकात म्हटलंय- ‘रॉयल्टीचा मुद्दा लता मंगेशकर यांनी निर्मात्यांसमोर मांडला होता, लताजींना आशा होती की या लढ्यात रफीसाहेबही त्यांना साथ देतील…’

लता मंगेशकरांना आशा होती, पण रफीही मागे हटायला तयार नव्हते

पण मोहम्मद रफी यांचे मत या बाबतीत लता मंगेशकर यांच्यापेक्षा वेगळे होते. रफी साहेब म्हणाले की, “जेव्हा गायकांना त्यांची फी मिळत असते, मग ते कशासाठी रॉयल्टी मागत असतात, त्यात गायकांचा काहीही अधिकार नाही.”

रफीसाहेबांचं म्हणणं ऐकून लता मंगेशकर भडकल्या

लता मंगेशकर यांनी टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. त्या म्हणाल्या, त्यावेळी एक बैठक झाली होती. त्या बैठकीत मोठमोठे गायक आणि मोहम्मद रफीही होते. त्या दिवशी त्या बैठकीतल्या चर्चेत अचानक रफीसाहेब उभे राहिले आणि म्हणाले – आजपासून मी लतादीदींसोबत गाणार नाही. हे ऐकून मी त्यांना थांबवलं आणि म्हणाले- ‘तुम्ही काय मीच तुमच्यासोबत गाणार नाही’

‘रफी साहेबांनी पत्र लिहून माफी मागितली होती’

यानंतर काही वर्षे दोघांमधील संवाद थांबला. त्यानंतर लता मंगेशकर यांनी महेंद्र कपूर यांच्यासोबत गाणी गायली. त्यानंतर काही वर्षे उलटून गेल्यावर एके दिवशी दोघांमध्ये संवाद झाला. खरंतर, संगीत दिग्दर्शक शंकर यांनी दोघांना समेट घडवून आणण्यात मोठा वाटा उचलला होता. याबाबत लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की, ‘त्यांनी मला रफी साहब यांचे एक पत्र दिले होते. त्यात त्यांनी माफी मागितली होती. लता मंगेशकर यांच्या या विधानाने नंतर गदारोळही झाला. 2012 मध्ये लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत हे सांगितले होते, तेव्हा मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहिद रफीने ही गोष्ट चुकीची असल्याचं सांगितलं होतं. आपल्या वडिलांनी लता मंगेशकर यांना असं काहीच म्हटलं नव्हतं, किंवा तसं पत्रही लिहिलं नव्हती, असं सांगितलं.

लता मंगेशकर यांनी विविध भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. प्रदीर्घ काळ पार्श्वगायन क्षेत्रावर त्यांची मोहिनी होती. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची कधीही भरुन न येणारी हानी झाली आहे.

संबंधित बातम्या

Lata Mangeshkar: लता मंगेशकर एकमेवाद्वितीय, त्यांचा आवाज अमर राहील; लतादीदींच्या निधनाने पाकिस्तानही हळहळला

Lata Mangeshkar : शरद पवार पंतप्रधान व्हावे, लतादिदींनी व्यक्त केलेली इच्छा-सोलापूरचे माजी महापौर

युगप्रवर्तक गायिका म्हणून 1978 मध्येच बहाल केली होती डीलिट पदवी, शिवाजी विद्यापीठाने म्हटले होते जगावर लतादीदींच्या सुरांचे साम्राज्य

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.