सिनेमात काम देण्याच्या बहाण्याने अभिनेत्रीवर बलात्कार; इन्स्टाग्रामवरील मित्रानेच केला घात

या अभिनेत्रीने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. ती दिल्लीला राहत असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. 29 जून रोजी गुरुग्राम येथील उद्योग विहार येथील एका हॉटेलात या व्यक्तीने तिला बोलावलं होतं.

सिनेमात काम देण्याच्या बहाण्याने अभिनेत्रीवर बलात्कार; इन्स्टाग्रामवरील मित्रानेच केला घात
Bhojpuri actressImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 7:27 AM

नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : एका भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका व्यक्तीने या अभिनेत्रीला सिनेमात काम देण्याच्या बहाण्याने हॉटेलवर इंटरव्ह्यूवला बोलावलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. धक्कादायक बाब म्हणजे हे कृत्य करणारा व्यक्ती तिचा इन्स्टाग्रामवरील मित्रच आहे. या घटनेमुळे संपूर्ण भोजपुरी सिनेमाजगत हादरून गेलं आहे. पोलिसांना या घटनेची कालच माहिती मिळाली असून अधिक तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीची इन्स्टाग्रामवर या व्यक्तीशी चर्चा झाली होती. महेश पांडे असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याने या अभिनेत्रीला भोजपुरी सिनेमात काम देण्याचं अमिष दाखवून तिला गुरुग्राम येथील हॉटेलवर बोलावलं. त्यानंतर तिच्यावर त्याने अत्याचार केला.

हे सुद्धा वाचा

29 जून रोजीची घटना

या अभिनेत्रीने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. ती दिल्लीला राहत असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. 29 जून रोजी गुरुग्राम येथील उद्योग विहार येथील एका हॉटेलात या व्यक्तीने तिला बोलावलं होतं. हॉटेलचा रुम आधीच बूक केलेला होता. जेव्हा ती तिथे गेली तेव्हा इंटरव्ह्यूच्या नावाखाली तिला काही प्रश्न विचारले गेले. त्यानंतर तो व्यक्ती दारू पिऊ लागला. नंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.

गुन्हा दाखल

त्यानंतर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या मित्राच्या माध्यमातूनही त्याने तिला फोन करून धमकावलं. सोशल मीडियावर व्हिडीओ टाकण्याची धमकीही त्याने दिल्याचं या अभिनेत्रीचं म्हणणं आहे. या प्रकरणी उद्योग विहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशी सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.

भोजपुरी इंडस्ट्रीत खळबळ

दरम्यान, या धक्कादायक घटनेने भोजपुरी सिनेजगतात खळबळ उडाली आहे. आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करण्याची भोजपुरी इंडस्ट्रीतून मागणी होत आहे. अशा प्रकारामुळे भोजपुरी इंडस्ट्री बदनाम होत आहे. कलाकारांनीही कोणत्याही व्यक्तीला भेटताना सावध राहिलं पाहिजे, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.